मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना | Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana Maharastra 2023 Apply Now

आपल्या राज्यातील शेती ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर व्हावी तसेच शेतकरी सुखी आणि संपन्न व्हावा असे महाराष्ट्र शासनाचे ध्येय आहे. म्हणूनच आपले राज्य शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना किंवा धोरणे राबवत असते. | Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana, Maharashtra Solar Pump Yojana 2023 marathi, Maharashtra Solar Pump Yojana Online Marathi , Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana marathi

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

Maharashtra Mukhyamantri Saur Krishi Pump Yojana– मित्रांनो जर शेतकऱ्यांनी शेतामध्ये धान्य पिकवले तरच आपल्याला ते मिळवता येते शेतकरी हा दिवस-रात्र शेतीमध्ये काम केल्यानंतर आपल्याला अन्नधान्य मिळते.

आपल्या राज्याने सौर कृषी पंप योजना यासाठीच आणलेली असून आणखी अनेक योजना राज्यातर्फे शेतकऱ्यांच्या हितासाठी चालू आहेत.

सौर ऊर्जा हा ऊर्जेचा अखंड आणि शाश्वत अशा प्रकारचा स्त्रोत आहे. आपल्या देशामध्ये आठ महिने कडक ऊन असते. तसेच निसर्ग कडून मिळालेल्या या कायमस्वरूपी ऊर्जेच्या स्त्रोताचा वापर करून राज्यामध्ये कृषी पंप योजना आणलेली आहे. या सौर कृषी पंपाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसाठी मदत होणार आहे.

ज्या प्रकारे मानवी जीवनामध्ये पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे त्याच प्रकारे शेतीला सुद्धा खूप प्रमाणात पाणी लागते.

पारंपारिक ऊर्जेचे स्त्रोत आता फार कमी प्रमाणात उपलब्ध राहिलेले असून आता आपल्याला अपारंपारिक प्रकारच्या स्त्रोतामधून वीजनिर्मिती करण्याची आवश्यकता आहे.

म्हणूनच महाराष्ट्र सौर कृषी पंप योजना ही राज्यात आणलेली असून या तर्फे तुम्हाला किती अनुदान मिळणार, पात्रता, तसेच आवश्यक कागदपत्रांची माहिती आपण खाली पाहणार आहोत.

वीज निर्मितीसाठी नैसर्गिक खनिजांचा आणि साधनांचा खूप वापर झाल्यामुळे वातावरण हे दूषित झालेल्या असून आता या सर्वांचा विचार करून तसेच पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या हेतूने पर्यावरण पूरक ऊर्जा स्त्रोत तयार करण्याचे धोरण जाहीर केलेले आहे.

अपारंपारिक ऊर्जा ही शाश्वत आणि निरंतर उपलब्ध राहणार असून या सौर ऊर्जेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा म्हणून हे शासन आणण्यात आलेली आहे

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana
Maharashtra Mukhyamantri Saur Krishi Pump Yojana

महाराष्ट्र राज्य सौर कृषी पंप योजना | Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana

ही योजना शासनाद्वारे शेतकऱ्यांना शेतीसाठी सिंचन सुविधा व्हावी म्हणून उपलब्ध केलेली आहे.

आपल्याला तर माहितीच आहे की शेतकरी हे विजेवर चालणारे कृषी पंप वापरतात मात्र विद्युत पुरवठ्यामध्ये खंड पडतो, तसेच रोहित्रा मध्ये बिघाड होणे, विज अपघात, तसेच वीज चोरी यासारख्या घटनांमुळे घटनांमुळे अखंडित वीजपुरवठा होण्यास अडचणी होतात.

ज्या गावांमध्ये वीजपुरवठा नसतो तिथे शेतकरी डिझेल कृषी पंप चालवतात हे डिझेल आता फार महाग आहे. या सर्व समस्यांवर उपाय म्हणजे सौर कृषी पंप योजना आहे.

या योजनेद्वारे सर्व समस्यांवर मात करून शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

सौर कृषी पंप योजनेची वैशिष्ट्ये | Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana

 • महाराष्ट्र राज्यामध्ये सौर कृषी पंप योजना राबवण्याबद्दल घेतलेल्या निर्णयासोबत राज्य सरकारने एक लाख सौर कृषी पंप देण्याचे अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे.
 • ही तरतूद अनुसूचित जाती जमाती तसेच विद्यार्थ्यांकरिता विशेष घटक योजना किंवा आदिवासी उपयोजना अंतर्गत मिळणाऱ्या निधीचा वापर करून नवीन सौर कृषी पंप योजना तयार करण्यासाठी मान्यता दिली आहे.
 • शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे तसेच पारंपारिक पद्धतीने कृषी पंप जोडण्यासाठी या खर्चाची बचत व्हावी.
 • या करता राज्यातील शेतकऱ्यांना कृषी सिंचनासाठी एक लाख सौर कृषी पंप हळूहळू उपलब्ध करून देणे हा शासनाचे उद्देश आहे
 • सौर कृषी पंप योजना हे पूर्णपणे महाराष्ट्र शासनाची योजना आहे.
 • या योजनेच्या माध्यमातून तीन वर्षांच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना एक लाख सौर कृषी पंप हे टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहेत
 • पहिल्या टप्प्यामध्ये पंचवीस हजार दुसऱ्या टप्प्यामध्ये 50 हजार तसेच तिसऱ्या टप्प्यात 25 हजार सौर कृषी पंप देण्याचे उद्दिष्ट ठरले आहे
 • योजनेअंतर्गत प्रत्येक टप्पा हा प्रत्यक्ष सुरू झाल्यापासून 18 महिन्यांपर्यंत राबवण्यात येणार आहे

या योजनेअंतर्गत सर्व कृषी पंपांच्या किमती चा 95% अनुदान हे महाराष्ट्र राज्य देणार असून लाभार्थी शेतकऱ्यांना 5% रक्कम भरायची आहे.

सौर कृषी पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना 5 एकर पर्यंत जमीन आहे त्यांना 3 HP पंप देण्यात येतील 5 एकर पेक्षा जास्त शेतजमीन असणाऱ्यांना 5 HP आणि 7.5 HP पंप देण्यात येणार आहेत.

योजनेचे नावसौर कृषी पंप योजना महाराष्ट्र
सुरुवातमहाराष्ट्र शासन
उद्देश्यराज्याच्या शेतकऱ्यांना सोलर पंप उपलब्ध करून देणे
लाभार्थीमहाराष्ट्र राज्याचे शेतकरी
विभागMSEDCL
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अधिकृत संकेतस्थळ https://www mahadiscom.in/solar
Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana , Maharashtra Solar Pump Yojana Online
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

महाराष्ट्र राज्य सौर कृषी पंप योजनेचे उद्दिष्ट | Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana

 • राज्यातील अनेक गावांमध्ये शेतकरी हे अजूनही शेती करण्यासाठी डिझेल पंप किंवा इलेक्ट्रिक पंप वापरतात मात्र दुर्गम भागातील शेतकऱ्यांना वीज नसल्यामुळे डिझेल पंप वापरावे लागतात.
 • हे डिझेल पंप महाग असतात तसेच आता डिझेलच्या किमती सुद्धा फार वाढलेल्या आहेत यामुळे शेतीसाठी फार खर्च होतो या सर्व गोष्टींमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते.
 • या नुकसानापासून वाचवण्यासाठीच सौर कृषी पंप योजना आणलेले असून या योजनेच्या माध्यमातून पर्यावरणाचे संरक्षण देखील होणार आहे.
 • विदर्भामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत अशा अति दुर्गम भागांमध्ये शेतकऱ्यांसाठी ही योजना राबवण्यात येणार आहे.
 • त्यामुळे भरावयाचे पैसे हे कमीत कमी ठेवून बाकीचे सर्व रक्कम ही वित्तीय संस्थेमार्फत कर्ज स्वरूपात देण्यात येणार आहे आणि या कर्जाची परतफेड ही महावितरण कंपनी द्वारे टप्प्या टप्प्यात करण्यात येणार आहे.
 • सौर कृषी पंप केंद्राच्या आधारभूत किमतीच्या 10% आणि अनुसूचित जाती तसेच जमाती यांना 5% हिस्सा राहील.
 • या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व जमातीतील शेतकऱ्यांना भरावयाचा हिस्सा.
लाभार्थी3 HP पंप शेतकरी हिस्सा5 HP पंप शेतकरी हिस्सा7.5 HP पंप शेतकरी हिस्सा
सर्वसाधारण16,560 रु. (10 %)24,710 रु. (10%)33,455 रु. (10%)
अनुसूचित जाती8,280रु. (5%)12,355 रु. (5%)16,728 रु. (5%)
अनुसूचित जमाती8,280रु. (5%)12,355 रु. (5%)16,728 रु. (5%)
Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana, Maharashtra Solar Pump Yojana Online

अधिक माहितीसाठी क्लिक करा

सौर कृषी पंप योजनेच्या लाभार्थ्यांसाठी पात्रता | Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana

 • या योजनेची प्रमुख पात्रता अशी आहे की ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत्र म्हणजेच विहिरी किंवा पाण्याची व्यवस्था आहे असे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत, मात्र त्यांच्याकडे वीज कनेक्शन नसणे आवश्यक आहे.
 • या योजनेमार्फत पाच एकर पर्यंत ज्या शेतकऱ्यांना 5 एकर पर्यंत जमीन आहे त्यांना 3 HP पंप देण्यात येतील 5 एकर पेक्षा जास्त शेतजमीन असणाऱ्यांना 5 HP आणि 7.5 HP पंप देण्यात येणार आहेत.
 • वनविभागाचे ना हरकत प्रमाणपत्र, तसेच पारंपारिक वीज कनेक्शन नसलेले, शेतकऱ्यांना तसेच महावितरण कंपनीकडे पैसे भरून सुद्धा कनेक्शन मिळाले नाही असे शेतकरी, आणि ज्यांना जवळच्या काळात वीज कनेक्शन भेटले नाही, तसेच अती दुर्गम भागातील शेतकरी, व महाराष्ट्राच्या धडक सिंचन योजने मध्ये लाभ घेतलेले शेतकऱ्यांना या योजनेमध्ये प्राधान्य राहणार आहे.
 • वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, गावातून वाहत असलेली नदी, किंवा नाले यांच्या शेजारी जर तुमची शेत जमीन असेल तर हे शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र आहेत .
 • या योजनेअंतर्गत लाभार्थी हेसा म्हणून सर्वसाधारण गटांच्या शेतकऱ्यांकडून दहा टक्के आणि अनुसूचित जाती जमातींच्या शेतकऱ्यांकडून पाच टक्के या प्रकारे भरावे लागणार आहे.

सौर कृषी पंप योजनेचा लाभ | Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana

Mukhyamantri Saur Krishi Pump Yojana 2023 Marathi, Maharashtra Solar Pump Yojana Online

 • या योजनेचा लाभ हा राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार असल्यामुळे योजनेच्या द्वारे विद्युत कृषी पंप याच्या जागेवर सौर कृषी पंप उपलब्ध होणार आहेत.
 • सर कृषी पंपांवर सबसिडी देण्यात येणार असून सौर कृषी पंप या योजनेमध्ये सरकार हे पंपाच्या किमतीच्या 95% सबसिडी देणार असून शेतकऱ्याना पाच टक्के रक्कम भरायची आहे.
 • या योजनेमध्ये पाच एकर पर्यंत शेत असणाऱ्या शेतकऱ्यांना तीन एचपी व यापेक्षा जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना पाच एचपी पंप देण्यात.
 • या योजनेद्वारे पर्यावरणाचे संरक्षण सुद्धा होणार आहे.
 • ज्या शेतकऱ्यांकडे विद्युत कनेक्शन आहेत त्यांना या योजनेद्वारे सौर ऊर्जेवर चालणारे AG पंप दिले जाणार नाहीत.
 • टप्प्याटप्प्यामध्ये ही योजना राबविण्यात येणारा असून आधी 25,000 नंतर 50,000 व तिसऱ्या टप्प्यात पण पुन्हा 25,000 कृषी पंप देण्यात येणार आहेत.
 • या योजनेची पद्धत ऑनलाईन असल्यामुळे कोणताही शेतकरी कुठे नाही केव्हाही आणि कधीही अर्ज करू शकतो यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचणार आहे
 • या योजनेमुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिल्या जाणाऱ्या वीज अनुदानाचा राज्याच्या शासनावरचा बोजा कमी होण्यास मदत होणार आहे
 • या योजनामुळे जुने डिझेल पंप जाऊन त्या जागी सौर पंप आल्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होईल तसेच वीज वितरणाचा सुद्धा फार कमी होण्यास मदत होणार आहे
 • या योजनेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान कमी होऊन शेतीचे उत्पादन वाढवण्यावर भर दिला जाणार आहे

सौर कृषी पंप योजनेच्या अंमलबजावणीची प्रक्रिया | Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana

 • ही योजना महा ऊर्जा सामाजिक न्याय विभाग जिल्हाधिकारी आदिवासी विकास विभाग जिल्हा कृषी अधिकारी तसेच भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा इत्यादी लोकांच्या समन्वयाने राबवण्यात येणार असून या योजनेची प्रसिद्धी ही महावितरण कंपनी द्वारे करण्यात येणार आहे
 • या योजनेसाठी शेतकऱ्यांची निवड ही जिल्हास्तरीय समितीद्वारे करण्यात येणार असून शिफारस केलेल्या पात्र शेतकऱ्यांकडून कृषी पंप बसवण्यासाठी आवश्यक लाभार्थी सहा महावितरणाच्या संबंधित जिल्हा स्तरीय कार्यालयामध्ये जमा करणे आवश्यक आहे.
 • शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या HVDS योजनेअंतर्गत ज्या गावांमध्ये वीज पुरवठा करण्यासाठी पायाभूत खर्च अडीच लाखापेक्षा जास्त असेल तिथे सौर कृषी पंप प्राधान्य देण्यात यावा, तसेच या योजनेअंतर्गत कृषी पंप हे खुल्या निविदा प्रक्रियेद्वारे महावितरणाकडून करण्यात यावे, तसेच या पंपान करता कार्यादेश सुद्धा महावितरण तर्फे पुरवठादार आज देण्यात यावे.
 • त्याचप्रमाणे हे सौर कृषी पंप देताना जे उरलेले शेतकरी आहेत त्यांना कृषी पंप. वितरण करण्यात प्राधान्य देण्यात येईल व भरलेली रक्कम ही लाभार्थी हिस्सा सोबत पकडली जाईल
 • या कृषी पंपांचा दर हा निश्चित करण्यात येऊन महसूल विभागामधून पुरवठादारांंचे पॅनल तयार करण्यात येणार आहे या पॅनल मधील कोणत्याही एका पुरवठादाराकडून कृषी पंप घेण्यात येईल व याबाबत शेतकऱ्यांना निवडीचे स्वातंत्र्य राहील.
 • ऊर्जा मंत्रालय भारत सरकार यांनी सौर कृषी पंपाचे तांत्रिक मानदंडानुसार ते बनवण्याची जबाबदार ही महावितरणाची राहील तसेच या पंपांच्या गुणवत्ता नियंत्रणाची जबाबदारी सुद्धा महावितरणाकडे राहील.
  दिले जाणारे सोलर पंप हे भारतीय बनावटीचे IEC प्रमाणित किंवा RFID टॅग सुविधा देणारे पुरवठादार असायला हवेत यासाठी या साहित्याची खात्री ही महावितरणाद्वारे होणार आहे.
 • या पंपांचा हमी कालावधी हा पाच वर्षांचा असेल व सोलर मॉडेलची वॉरंटी ही दहा वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
 • हे कृषी पंप संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आल्यानंतर त्याच्या देखभालीची जबाबदारी ही शेतकऱ्यांवर राहणार आहे.
 • कृषी पंप शेतकऱ्यांना दिल्यानंतर त्याचे अहवाल आणि अधीक्षक अभियंता महावितरण यांच्याकडून महावितरण कार्यालयाच्या मुख्यालयामध्ये सादर करण्यात येणार आहेत.
 • महावितरण हे वित्तीय सहाय्याच्या रकमेची मागणी करून निधी जमा करून घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.
 • महावितरण तर्फे या सौर कृषी पंपांची तांत्रिक तपासणी करण्यात येईल.
 • या योजनेसाठी अर्जाचे नमुने उपयोगिता प्रमाणपत्र तसेच स्थापनेचा अहवाल तसेच संबंधित बाबी आणि तांत्रिक तपासणी ही महावितरण तर्फे केली जाईल.
 • महाराष्ट्र राज्याच्या व इतर आर्थिक स्त्रोतांमधून महावितरण कडून प्राप्त होणाऱ्या पैशांचे उपयोगिता प्रमाणपत्र तसेच भौतिक व आर्थिक अहवाल हे महावितरण वेळोवेळी सादर करेल.

सौर कृषी पंप योजनेसाठी आवश्यकता कागदपत्रे

Maharashtra Solar Pump Yojana Online Application, Maharashtra Solar Pump Yojana Online

 • शेतकऱ्याचे आधार कार्ड
 • मूळ निवासी प्रमाणपत्र
 • शेतीचे कागदपत्र
 • बँकेचे पासबुक
 • ओळखपत्र
 • पासपोर्ट साईज फोटो
 • मोबाईल नंबर
 • सातबारा उतारा

सौर कृषी पंप योजना साठी हेल्पलाइन नंबर 1800 102 3435 / 1800 233 3435

अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा

योजनेच्या अधिकृत माहितीसाठी किंवा PDF मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

तर मित्रांनो हा लेख कसा वाटला हे आम्हाला तुमच्या कमेंट्स द्वारे नक्की कळवा.

आमच्या साइटवरील इतर पोस्ट सुद्धा वाचा

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) Ayushman Bharat Yojana PM Jan Arogya 2023 in Marathi

आता काढा फक्त 436 रुपयांमध्ये दोन लाखांचा विमा |

Pandit Dindayal Swayam Yojana 2023

राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती योजना

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

Leave a comment