प्रधानमंत्री जनधन योजना|Pradhan Mantri Jan Dhan Yojana 2023

Pradhan Mantri Jan Dhan Yojana in marathi प्रधानमंत्र्यांद्वारे दिल्ली मधून या योजनेची सुरूवात करण्यात आली, त्याच दिवशी देशातील २० राज्यांमध्ये या योजनेची सुरुवात करण्यात आली.

ब्रीदवाक्य  – मेरा खाता भाग्यविधाता

Pradhan Mantri Jan Dhan Yojana in marathi
Pradhan Mantri Jan Dhan Yojana in marathi

प्रधानमंत्री जनधन योजनेचा उद्देश

देशातील नागरिकांना वित्तीय सेवा उपलब्ध करून देणे.देशातील आर्थिक दुर्बल घटकांतून सावकारी प्रमाण कमी करणे देशातील आर्थिक दुर्बल घटकांना बँकांशी जोडणे.देशातील प्रत्येक गरीब कुटुंबाला बँकसेवा व कर्ज पुरवठा सुविधा उपलब्ध करणे इ. वित्तीय समावेशनाचे उद्दिष्ट प्राप्त करण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री जनधन योजना सुरू करण्यात आली.

लक्ष्य – एका वर्षामध्ये ७.५ कोटी बँक खाती उघडणे.

योजनेची घोषणा  – १५ ऑगस्ट, २०१४ –

योजनेची सुरुवात  – २८ ऑगस्ट, २०१४

ही योजना National Payment Corporation in India (NPCI) द्वारे राबविण्यात

प्रधानमंत्री जनधन योजनेचे फायदे Pradhan Mantri Jan Dhan Yojana Benifits

१) डिपॉजिट वरती व्याज देण्यात येते.

२) जनधन खात्यावरती मोफत मोबाईल बँकिंग सुविधा देण्यात येते..

३) जनधन खाते उघडणान्यास रुपे डेबिट कार्ड उपलब्ध करण्यात येते.

४) जनधन खात्याअंतर्गत विमा, पेंशन प्रोडक्टस खरेदी करणे सोपे आहे.

५) जनधन खाते असेल तर पीएम किसान आणि श्रमयोगी मानधन सारख्या योजनांमध्ये पेंशनसाठी खाते

सुरू राहिल.

६) देशभरात पैसे पाठविण्याची सुविधा

जनधन खाते प्रकार आधारभूत बचत जमा खाते

 इथे वाचा – अटल पेशंन योजना चे फायदे

प्रधानमंत्री जनधन योजनेचे वैशिष्ट्ये

१) न्युनतम बॅलंसची अट नाही.

२) ४% व्याज आणि इतर सुविधा

३) एटीएम कार्डची सुविधा

४) मोबाईल बँकिंग व एसएमएस सुविधा

५) १ लाख रुपयांपर्यंत अपघाती विमा सुविधा

जनधन खाते मर्यादा –

१) एका महिन्यात ४ वेळापेक्षा अधिक पैसे काढल्यास १० रु. प्रति व्यवहार शुल्क आकारण्यात येते..

२) एका वर्षामध्ये १ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करता येणार नाही.

३) एका महिन्यात १० हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम खात्यातून काढता येणार नाही.

४) झिरो बॅलंस अकाऊंटवरती चेक ड्राफ्टची सुविधा नाही.

प्रधानमंत्री जनधन योजना ज्यादिवशी प्रारंभ झाली त्याच दिवशी संपूर्ण देशामध्ये ६०० कार्यक्रम घेण्यात आले. त्याचबरोबा ७७८५२ करण्यात आली. या सेवा बिगर इंटरनेट मोबाईल वरही उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

Pradhan Mantri Jan Dhan Yojana in marathi प्रधानमंत्री जनधन योजना ही गरीब जनतेस आर्थिक सशक्त बनविण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आली आहे, ज्यामध्ये भारतीय व्यक्तीचे एकही बैंक खाते नाही अशा व्यक्तींना या योजने अंतर्गत बँक खाते उपडण्याचे आवाहन करण्यात आले. रोज एखादा भारतीय नागरिक पूर्वीचे बँक खाते या योजनेत सहभागी करू इच्छित असेल तर ते करू शकतो. त्याही सर्व सोयी-सुविधा पुरवल्या जातील, ज्या या योजनेत समाविष्ट आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे या योजनेची सुरुवात करतेवेळी ‘विश्व चक्रातून गरिबांचे स्वातंत्र्य पर्व’ असे उद्गार उच्चारण्यात आले.

• प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत १० वर्षांवरील मुले / मुली खाते उघडू शकतात, ज्याची पाहणी त्यांचे खाते माता-पिताद्वारे पाहण्यात येईल. या योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी योग्य कागदपत्रांची आवश्यकता असते; परंतु एखादया व्यक्तीजवळ कागदपत्रे सतील तर अशी व्यक्ती गॅजेटेड ऑफिसरमार्फत प्रमाणित केलेले प्रमाणपत्र बँकेत जमा करून खाते उघडू शकते. त्यास “Low Rink Account’ किंवा ‘स्मॉल अकाऊंट’ असेही म्हटले जाते. असे खाते एक वर्षासाठी सुरक्षित ठेवले जाईल.

या एका वर्षांमध्ये खातेधारकास एखादे योग्य प्रमाणपत्र बँकेत जमा करावे लागेल.

प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत खातेधारक ६ महिन्यांनंतर ५००० रु. कर्ज स्वरूपात (ओव्हरड्राफ्ट) मिळवू शकतात. या योजनेअंतर्गत बैंकिंग सुविधा सर्वसुलभ बनविण्याचा प्रयत्न केला जाईल. यामध्ये प्रत्येक कुटुंबासाठी कमीत कमी एक बँक खाते खोलणे, वित्तीय सक्षमता, कर्ज आणि विमा सुविधा उपलब्ध करणे या सुविधा पुरविल्या जातात.

या योजनेत लाभार्थ्यास १ रुपयात डेबिट कार्ड दिले जाते, ज्यामध्ये १ लाख रुपयांचा अपघाती विमा उतरविला जात होता.या व्यतिरिक्त १५ ऑगस्ट, २०१४ ते २६ जानेवारी, २०१५ दरम्यान बँक खाते उघडणाऱ्यास व योजनेच्या पात्रतेसंदर्भात

इतर अटी पूर्ण करणाऱ्यास ३०,००० रुपयांची जीवन विम्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत दुर्घटना विमा संरक्षण मिळवण्यासाठी ४५ दिवसांतून कमीत कमी एकदा तरी डेबिट कार्डचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री जनधन योजनेत सर्वाधिक बँक खाती उघडल्याने या योजनेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदकरण्यात आली आहे. (२३ ते २९ ऑगस्ट २०१४ या सात दिवसांत १ कोटी ८० लाख ९६ हजार बँक खाती उघडण्यातआली ) प्रधानमंत्री जनधन योजनेत एका दिवसात १.५ कोटी बँक खाती उघडण्यात आली व तेवढ्याच व्यक्तींना अपघाती विमा पॉलिसी जाहीर करण्यात आली.

• प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये परकाम करणाऱ्या महिलांना प्राथमिकता देण्यात आली.

• प्रधानमंत्री जनधन योजना ग्रामीण आणि शहरी भागासाठी समान प्रमाणात लागू करण्यात आली आहे.

• प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत झिरो बॅलन्स खाते उघडता येते.

• प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत सर्व बँक खातेदारांना ‘रूपे (Rupay)’ कार्ड दिले जाणार आहे.

•Rupay म्हणजे Rupees आणि Payment. हे एक डेबिट कार्ड आहे, ज्यामधून रुपयातली देणी दिली जातात.

● या डेबीट कार्ड अंतर्गत आता देशातील कोणत्याही भागातील कोणत्याही वेळी कार्डधारकांना ATM मधून पैसे मिळविण्याचह सुविधा उपलब्ध झाली आहे.

प्रधानमंत्री जनधन योजनेस २०१५-१६ नंतर सेवा करातून सूट देण्यात आली आहे.

सुधारित जनधन योजना

Pradhan Mantri Jan Dhan Yojana in marathi सुधारित जनधन योजना ऑगस्ट, २०१८ पासून अमर्यादित कालावधीपर्यंत राबवण्यात येणार आहे. सुधारित योजनेंतर्गत ओव्हरड्राफ्टची रक्कम ५ हजार रुपयांवरून १० हजार रुपयांपर्यत वाढविण्यात आली आहे.

सुधारित योजनेमध्ये १८ ते ६५ वर्षांपर्यंतचे सर्व लाभार्थी बँक खाते उघडू शकतात. तसेच त्यांना ओव्हरड्राफ्टची सुविधाही दिली जाणार आहे. या योजनेंतर्गत रुपे डेबीट कार्डवर १ लाख रुपयांऐवजी २ लाख रुपयांचा विमा उतरविला जाई