Cibil Score: तुमची ही चूक नक्कीच तुमचा सिबिल स्कोर कमी करू शकते? कर्ज घेण्यास अडथळा होईल; पहा महत्वाची बातमी;

Cibil Score Tips: कोणत्याही अडचणी वेळी आपल्याला आर्थिक गरज भासत असेल तर कर्ज घेण्याची वेळ येते. त्यामुळे कित्येक नागरिकांना बँकेचा सुद्धा आधार घ्यावा लागतो. या माध्यमातून नागरिक पर्सनल लोन घेतात आणि आपल्या जीवनातील आर्थिक गरजा भागवत असतात. यासोबतच नवीन घर खरेदी करायचे असेल, नवीन गाडी खरेदी करायची असेल, तसेच इतर बाबी खरेदी करायचे असतील. तर कित्येक नागरिक कर्ज सुविधेचा लाभ घेऊनच पैसा उपलब्ध करतात आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम म्हणून या गोष्टी पूर्ण करतात.

सिबिल स्कोर चेक ऑनलाइन फ्री- Cibil score in marathi online, How to check cibil score in marathi

Cibil Score
Cibil Score

परंतु आपल्याला ही गोष्ट माहीतच असेल की कोणत्याही प्रकारचे कर्ज तुम्हाला उपलब्ध करून घ्यायचे असेल तर सर्वात प्रथम तुमचा जो काही सिबिल स्कोर आहे तो अगदी व्यवस्थित रित्या असणे गरजेचे आहे. कारण बँक सर्वात प्रथम हा सिबिल स्कोर तपासते (Cibil Score Latest Update). जर हा सिबिल स्कोर चांगला असेल तर नक्कीच बँक तुम्हाला कर्ज देते. तुमच्या क्रेडिट ची हिस्ट्री बघूनच बँक ठरवते पुढील व्यक्तीस कर्ज द्यायचे आहे की नाही. जितका मजबूत तुमच्या सिबिल स्कोर असणार आहे, तिथे तुम्हाला अगदी झपाट्यात तसेच अगदी कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध होणार आहे.

परंतु जर तुम्ही या अगोदर बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून घेतली असेल आणि वेळेवर त्या कर्जाची परतफेड केली नसेल तर अशावेळी ईएमआय वेळेवर नाही भरला, तर तुमच्या क्रेडिट स्कोर पूर्णपणे कमी होणार आहे. अशावेळी कर्ज मिळवणे खूपच कठीण होते. जर आपण सिबिल स्कोर कमी होत असेल या कारणाचा विचार करत असेल तर याचे प्रमुख कारण म्हणजे कर्जाची वेळेवर परतफेड न करणे.

तितकेच नाही; तर तुम्ही जर क्रेडिट कार्ड वापरत असाल तर अशावेळी त्याविषयी काही विशिष्ट चुका केल्या असतील तर तुमचा क्रेडिट स्कोर वर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते (Cibil Score Update). नेमकी याबद्दल कोणती चूक असणार आहे, तर आपला क्रेडिट स्कोर यावेळी कमी होऊ शकतो. याबद्दलची माहिती आपण अगदी तपशील पणे लक्षात घेऊया.

क्रेडिट कार्डच्या वापराने Cibil Score कमी कसा होऊ शकतो?

आता कित्येक नागरिक क्रेडिट कार्ड वापरत असतात; बऱ्याच वस्तू तसेच काही विशिष्ट गोष्टी खरेदी करण्यासाठी क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ईएमआय वर खरेदी केली जाते. अशावेळी क्रेडिट कार्डचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे; त्यामुळे बघितले तर तुमच्या क्रेडिट स्कोर नक्कीच कमी होऊ शकतो (latest news in marathi). हे जर तुम्हाला एका उदाहरणाच्या माध्यमातून समजायचे असेल तर तुमच्या क्रेडिट स्कोर नक्कीच कमी होऊ शकतो. हे जर तुम्हाला एका उदाहरणाच्या माध्यमातून समजायचे असेल तर तुमच्या क्रेडिट स्कोर नक्कीच कमी होऊ शकतो.

यावर लिमिट सोबतच तुम्ही चाळीस हजार रुपये किमतीची वस्तू खरेदी केली असेल तर काय होते हे जाणून घेऊया. या खरेदी केलेल्या वस्तूचा ईएमआय समजा पाच हजार रुपये असेल तर अशावेळी तुम्ही खरेदी केलेल्या क्रेडिट चा वापर किमतीच्या बरोबरच झाला म्हणजे चाळीस हजार रुपये इतका निश्चित झाला.

परंतु अशावेळी तुम्ही संबंधित ईएमआय जर वेळेवरती भरला तर सुद्धा तुम्हाला यावर विपरीत परिणाम झालेला पाहायला मिळेल (Cibil Score Information in marathi) अशावेळी तुमच्या एमआय बनवत असताना क्रेडिट चा वापर नेहमी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

क्रेडिट कार्डवरील क्रेडिट लिमिटचा वापर नक्की किती करावा?

जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर अशावेळी तुम्हाला क्रेडिट स्कोर चांगला ठेवणे गरजेचे आहे. अशावेळी तुमच्या क्रेडिट कार्ड वरील दिलेल्या लिमिटच्या जवळपास 30 टक्के पेक्षा कमी खर्च करणे अवनिवार्य र असते हे प्रमाण अगदी उत्तम सिबिल स्कोर यासाठी योग्य ठरले जात आहे. तसेच तुम्हाला क्रेडिट स्कोर सर्वात बेस्ट ठेवायचा असेल तर क्रेडिट युजरने दहा ते वीस टक्के ठेवणे गरजेचे आहे.

क्रेडिट स्कोरचे वर्गीकरण कसे केले जाते?

सर्वसाधारणपणे बघितले तर क्रेडिट स्कोर 300 ते 900 च्या दरम्यान असतो याची गणना या माध्यमातून केली जाते. यामध्ये जर तुमचा स्कोर 750 ते 800 च्या दरम्यान असेल तर तो खूप चांगला मानला जात आहे. यासोबतच 700 ते 750 च्या दरम्यान असेल तरी चांगल्या श्रेणीमध्ये येतो. 650 ते 700 च्या श्रेणीमध्ये येत असेल तर ठीक मानला जातो, परंतु 650 च्या कमी असेल तर तुमचा क्रेडिट स्कोर कमी आहे असे मोजले जाते.

Leave a comment