आता काढा फक्त 436 रुपयांमध्ये दोन लाखांचा विमा | Pradhanmantri Vima Yojana (PMJJBY)

Pradhanmantri Vima Yojana, Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana Policy मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेबद्दल तर ह्या योजनेबद्दल आपणांस तपशीलवार माहिती घेणार आहोत त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana Policy
Pradhanmantri Vima Yojana Jeevan Jyoti Bima Policy

प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजने बद्दल माहिती |Pradhanmantri Vima Yojana

Table of Contents

तर मित्रांनो भारतामध्ये केंद्र सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असते प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना सरकारने गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठी सुरू केलेली आहे.

आत्याच्या धकाधकीच्या जीवना मध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही त्यासाठी आपली सुरक्षा सर्वात महत्त्वाची असते म्हणूनच सरकारने हे सर्वात स्वस्त योजना आणलेली आहे जी आपल्या सर्वांसाठी उत्तम आहे.

प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना ही 2015 मध्ये सुरू झालेली होती. ही योजना एका प्रकारची मुदत योजना आहे.

या योजनेद्वारे विमाधारकाच्या कुटुंबास दोन लाख रुपये पर्यंत विमा म्हणजेच लाईफ कव्हर भेटतो.

या योजनेत सहभागी होण्यासाठी आपल्याला वार्षिक रक्कम द्यावी लागते ही एक नाममात्र किंमत आहे .

ही किंमत आपल्या बँकेच्या खात्यामधून दरवर्षी वजा केली जाते. त्यामुळे तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पुरेशी रक्कम ठेवणे गरजेचे आहे.

या विम्यामुळे विमाधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबासह 2 लाख रुपये एवढी विम्याची रक्कम दिली जाते.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी ची पात्रता

वय वर्षे 18 ते 50 पर्यंतचे सर्व लोक या योजनेसाठी पात्र आहेत ते सर्व लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

दुसरी पात्रता म्हणजे या योजनेसाठी तुमचे बँकेमध्ये सेविंग खाते असणे आवश्यक आहे. आणि ते खाते आधार ला लिंक असणे गरजेचे आहे.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी अर्ज कसा कराल | Pradhanmantri Vima Yojana

ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी इंटरनेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग चा वापर करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

ज्यांना हे शक्य नाही त्यांनी आपले सेविंग खाते ज्या बँकेमध्ये आहे त्या बँकेत जाऊन अर्ज करू शकता.

तसेच आम्ही हा अर्ज तुमच्यासाठी येथे उपलब्ध करून देत आहेत त्यासाठी या लिंक वर क्लिक करा.

हा अर्ज डाऊनलोड करून तुम्ही यामध्ये माहिती भरून हा अर्ज बँकेमध्ये सबमिट करू शकता.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी ची आवश्यक कागदपत्रे | Pradhanmantri Vima Yojana

PMJJBY Policy

  • अर्जदाराचे आधार कार्ड असणे आवश्यक.
  • ज्या बँकेमध्ये आधार कार्ड लिंक असलेले अकाउंट आहे त्या अकाउंटचे पासबुक आवश्यक.
  • मोबाईल नंबर.
  • पासपोर्ट साईज फोटो आवश्यक.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या कालावधी बद्दल माहिती

दरवर्षी या योजनेचे नूतनीकरण हे आपोआप होत असल्याकारणाने या योजनेचा कालावधी हा 1 जून ते 31 मे अशाप्रकारे 1 वर्षाचा असतो.

हप्त्याची रक्कम बँकेच्या अकाउंट मधून आपोआप वजा होत असल्याकारणाने विमा हा आपोआप एक वर्षाच्या कालावधीने वाढवला जातो.

त्यामुळे हप्त्याची रक्कम या कालावधीमध्ये तुमच्या अकाउंट मध्ये असणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा या योजनेचा हप्ता

या योजनेसाठी तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये कमीत कमी 436 रुपेश शिल्लक असणे आवश्यक आहे तर ती आपल्या खात्यातून वजा होईल.

18 ते 50 वर्षां मधील सर्व लोकांना ही योजना लागू होते.

हप्त्याची रक्कम ही दरवर्षी मे महिन्यामध्ये आपोआप आपल्या खात्यामधून वजा होते त्यामुळे आपल्याला बँकेत जाण्याची आवश्यकता नाही.

मात्र तुम्ही बँकेमध्ये जर रक्कम शिल्लक ठेवले नाही आणि तुमचा हप्ता कट झाला नाही तर तुमचा विमा आपोआप रद्द होऊन जाईल म्हणजेच बंद पडेल.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा या योजनेचे नूतनीकरण

खात्यामध्ये पैसे जर शिल्लक असतील तर तुमच्या विम्याचे आपोआप नूतनीकरण होईल मात्र ती रक्कम तुमच्या खात्यामध्ये शिल्लक नसेल तर तुमचा विमा बंद पडलेल्या नंतर तुम्हाला पुन्हा एकदा फॉर्म भरून द्यावा लागेल

ही प्रोसेस टाळण्यासाठी तुमच्या खात्यामध्ये कमीत कमी रक्कम शिल्लक ठेवा

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा या योजनेचे फायदे | Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana Benefits

एखाद्या व्यक्तीचे वय 18 ते 55 असताना त्या व्यक्तीने हा विमा घेतलेला असेल आणि काही कारणाने त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीच्या वारसास दोन लाख रुपये रक्कम मिळते याचा अर्थ वयाच्या 55 वर्षापर्यंत या विम्याचा तुम्हाला कव्हर मिळतो.

विमाधारकाचा मृत्यू हा अपघाताने झाला किंवा नैसर्गिक रित्या जरी झालेला असेल तरीसुद्धा तुमच्या कुटुंबास दोन लाख रुपयांची आर्थिक मदत मिळते.

इतर विमा कंपन्यांप्रमाणे ही योजना मुदत विमा योजना असल्यामुळे यामध्ये तुम्हाला सरेंडर व्हॅल्यू तसेच मॅच्युरिटी बेनिफिट अशा प्रकारच्या सुविधांचा लाभ या विम्यामध्ये होत नाही

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा समाप्ती

जर तुमचे वय 55 वर्षांपेक्षा जास्त असेल तर या विम्याचे कव्हर समाप्त होते.

या विम्यासाठी जे बँकेचे खाते जोडलेले आहे ते जर काही कारणामुळे बंद झाले किंवा बंद केले तर विम्याचे कव्हर समाप्त होऊ शकते.

तसेच तुमचे खाते जर विविध बॅंकांमध्ये असतील आणि या सर्व बँकांमधून तुम्ही अर्ज केलेला असेल तरीसुद्धा तुम्हाला एकाच खात्यामधून या विम्याचा लाभ घेता येईल.

या विम्या बरोबर जोडलेल्या बँकेच्या खात्यामध्ये कमीत कमी रक्कम शिल्लक नसेल तर हे तुमचे कव्हर समाप्त होऊ शकते.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा या योजनेचा क्लेम कसा करावा

क्लेम करण्यासाठी सर्वात आधी ज्या बँकेचे खाते तुमच्या विम्याला जोडलेले आहे त्या बँकेची संपर्क साधावा .

तिथे वारसदाराने प्लेन फॉर्म डाऊनलोड करून तो व्यवस्थित भरून त्याच्यासोबत मृत्यूचा दाखला देणे आवश्यक आहे.

हाच क्लेम वारसदार हा विमा कंपनीकडून किंवा बँकेमार्फत सुद्धा घेऊ शकतो

ज्या व्यक्तीच्या नावे विमा होता त्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला दवाखान्यातील डिस्चार्ज ची पावती, बँकेतील खात्याचे तपशील, नॉमिनीचे बँकेचे तपशील, तसेच कॅन्सल चेक, आणि जे जे आवश्यक कागदपत्रे आहेत ते सर्व बँकेत जमा करावेत.

यानंतर बँक सर्व कागदपत्रांची तपासणी करून विम्याचे रक्कम ही लाभार्थीच्या किंवा वारसदाराच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करते.

या योजनेबद्दल तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल किंवा अडचण आलेले असेल तर शासनाने यासाठी तुम्हाला टोल फ्री नंबर 1800-180-1111/ 1800-110-001 दिलेला आहे त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता तसेच इतर माहितीसाठी www.jansuraksha.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स द्वारे नक्की कळवा तसेच हा लेख तुमच्या सर्व मित्र परिवारामध्ये शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा या योजनेबद्दल माहिती कळेल.

तुम्ही हे वाचले का?

Leave a comment