शासनाच्या या योजनेत झाला बदल काय ते बघा|Pandit Dindayal Swayam Yojana 2023

Pandit Dindayal Upadhyay Swayam yojana
Pandit Dindayal Yojana

pandit dindayal swayam yojana marathi 1.अनुसूचित जमातीच्या शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वी नंतरच्या उच्च शिक्षणाकरीता भोजन, निवास व शैक्षणिक साहित्यासाठी त्यांच्या आधारसंलग्न बैंक खात्यामध्ये थेट रक्कम वितरण करण्याबाबत पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजना राबविण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.

२. सदर योजनेंतर्गत सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून सद्यस्थितीत शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या एकूण २०,००० विद्यार्थी संख्येच्या मर्यादेत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरीता भोजन, निवास व शैक्षणिक साहित्यासाठी त्यांच्या आधार संलग्न  असलेल्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरण करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

३. तसेच सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश घेणे किंवा पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजनेचा लाभ घेणे हे दोन पर्याय विद्यार्थ्याकडे उपलब्ध राहणार आहेत. सबब आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीतील शासकीय वसतीगृहातील एकूण मंजूर प्रवेश क्षमता ६१,०७० व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजनेंतर्गतची क्षमता २०,०००, अशा एकूण ८१,०७० एवढ्या क्षमतेच्या कमाल ५० टक्के मर्यादित सन २०१७-१८ पासून विद्यार्थ्यांना पसंतीनुसार व गुणानुक्रमाने पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम्” योजनेचा लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे.

४. सदर योजनेंतर्गत खालील ३ प्रकारे वर्गीकरण केलेल्या शहरांमधील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या तथापि, शासकीय वसतीगृहात प्रवेशीत नसलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इ. १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेण्याकरिता वार्षिक खर्चासाठी खालीलप्रमाणे निश्चित केलेनुसार विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरण करण्यात यावी.

pandit dindayal swayam yojana information in marathi

पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेमध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यात आला आहे Pandit dindayal swayam yojana


अधिक माहितीसाठी क्लिक करा-

सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून इ. १२ वी नंतरच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वसतीगृहप्रवेशनलेल्या एकूण २०,००० संख्येच्या मर्यादेत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन घेण्यासाठी तालुकास्तर, जिल्हास्तर, विभागीयस्तर व मोठ्या शहरामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बैंक खात्यामध्ये देय असलेली रक्कम थेट जमा करण्याबाबत पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजना सुरू करण्यात आलेली आहे.
वाचा मधील क्र. १ च्या शासन निर्णयातील क) इतर निकषातील मुद्दा क्र.३ नुसार पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्याथ्यांचे कमाल वय २८ वर्षापेक्षा अधिक नसावे अशी तरतूद आहे. सदर तरतूदीमध्ये सुधारणा करून सदर वयोमर्यादा ३० करण्याबाबतची मागणी विविध स्तरावरुन करण्यात येत होती. सदर मागणीच्या अनुषंगाने पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयम योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्याथ्यांचे कमाल वय ३० वर्ष करण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-

१. पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्याथ्यांचे कमाल जास्तीत जास्त वय ३० वर्षापेक्षा अधिक नसावे. या बदलास या शासन निर्णय  मान्यता देण्यात येत आहे.

२. याव्यतिरिक्त वाचा १२३ येथील शासन निर्णयातील उर्वरित अटी व शर्ती पूर्वीप्रमाणेच राहतील.उपरोक्त सुधारणांच्या अनुषंगाने सद्यस्थितीत कार्यरत संगणकीय प्रणालीमध्ये सुणारणा करण्याची जबाबदारी आयुक्त आादिवासी विकास नाशिक यांची राहील

pandit dindayal yojana pdf

Leave a comment