दीन दयाल उपाध्याय अंत्योदय योजना 2023 |Deen Dayal Upadhay Antyodaya Yojana

Deendayal Antyodaya Yojana Online Application | दीनदयाल अंत्योदय योजना 2023 मराठी | Deendayal Antyodaya Yojana Registration Online Marathi | NULM / NRLM | NULM / NRLM Registration | DAY Apply online Application Form |  दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय आजीविका मिशन | राष्ट्रीय शहरी आजीविका अभियान (NULM)

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

Dayal Upadhay Antyodaya Yojana Marathi – योजनेची सुरुवात केंद्र सरकारमार्फत शहरी आणि ग्रामीण गरिबांसाठी दीन दयाल उपाध्याय अंत्योदय योजना लागू करण्यात आली.

मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत दीनदयाल अंत्योदय योजनेची.

राष्ट्रीय शहरी आजीविका अभियान असे या योजनेचे पूर्वीचे नाव होते मात्र हे नाव बदलून दिनदयाल उपाध्याय अंत्योदय योजना असे करण्यात आलेले असून राष्ट्रीय शहरी आजीविका मिशन असे नाव हिंदी मध्ये करण्यात आले आहे.

ही योजना गृहनिर्माण आणि शहरी गरिबी निर्मूलन मंत्रालय यांच्याद्वारे सुरू करण्यात आली असून या योजनेसाठी 500 कोटी रुपयांपर्यंतची तरतूद केलेली आहे.

उददेश – कौशल्य विकास इतर उपाय यांचा उपयोग करुन जीवन जगण्याच्या उपायांच्या पद्धतीमध्ये वाढ करून शहरी भागातील  आणि ग्रामीण भागातील गरिबीचे प्रमाण कमी करणे.

Dayal Upadhay Antyodaya Yojana
Dayal Upadhay Antyodaya Yojana Marathi

दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजनेची सुरुवात |Dayal Upadhay gram jyoti yojana launch date

२५ सप्टेंबर, २०१४

शहरी भागात घटकाची कार्यवाही केंद्रीय आवास व शहरी गरिबी उच्चाटन मंत्रालयामार्फत करण्यात येते, तर ग्रामीण भागात घटकाची कार्यवाही केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयामार्फत करण्यात येते.

या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट :

 • तसेच या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की आपल्या समाजातील गरजू व अकुशल लोकांना कामासाठी प्रशिक्षण देणे आणि व्यवसायासाठी कर्ज देऊन बेघर व्यक्तींना घर देणे.
 • या योजनेद्वारे गरिबांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना मदत करणे.
 • गरिबी कमी करून स्वयम रोजगार आणि कुशल वेतन रोजगार यासाठी लोकांना सक्षम करणे.
 • गोरगरिबांच्या विविध संस्थांना ज्या तळागाळात आहे अशांना बळकट करून टिकून ठेवण्याचे उद्दिष्ट.
 • लोकांना शाश्वत उपजीविका विकसित करण्यासाठी मदत करणे.
 • या योजनेद्वारे हळूहळू 10 कोटी गरीब कुटुंबांपर्यंत पोहोचून त्यांना स्वयंरोजगाराद्वारे त्यांची परिस्थिती नीट करून त्यांच्या जीवनावर परिणाम करण्याचा प्रयत्न करणे.
योजनादीनदयाल अंत्योदय योजना 2023
सुरुकेंद्र सरकार
कोणासाठी गरीब नागरिक
सुरुवातजून 2011 ते सप्टेंबर 2013
योजना बजेट500 कोटी
श्रेणीकेंद्र सरकारी योजना
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
Dayal Upadhay Antyodaya Yojana Marathi

राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान ध्येय |Deen Dayal Upadhay Yojana

 • 2011 साली ग्रामीण विकास मंत्रालयाने राष्ट्रीय ग्रामीण आजीविका अभियान (NRLM) चालू केलं या अभियानाच्या माध्यमातून स्किल डेव्हलपमेंट द्वारे गरिबी व बेरोजगारी हटवून
 • भारतातील नागरिकांना त्यातूनही ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या कार्यक्षमतेची जाणीव किंवा माहिती करून देणे या योजनेचे ध्येय.
 • भारतातील जवळजवळ 600 जिल्ह्यांमध्ये असलेल्या सात कोटी कुटुंबांमध्ये ही योजना राबवण्यात येणार होती.
 • गरिबांना प्रशिक्षण दिल्यामुळे त्यांच्या कौशल्यामध्ये सुधारणा होऊन ते स्वयंरोजगार असे ध्येय ठेवून 2015 मध्ये पाठिंब्याद्वारे या योजनेला नवीन सुरुवात करण्यात आली व तिचे नाव बदलून दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना असे ठेवण्यात आले.

Deen Dayal Upadhay Antyodaya Yojana या योजने चे नवीन अपडेट.

 • आजादी का अमृत महोत्सव याचा एक भाग म्हणून ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे दीनदयाळ अंत्योदय योजना ही उपजीविकेचे अभियान म्हणून लोकांना साक्षरता आणि सेवा वितरण केंद्राद्वारे 2021 साली सुरू करण्यात आली.
 • ग्रामीण भागातील गरीब लोकांना आर्थिक सेवा देणे हे सुलभ करणे हा उद्देश आहे.
 • ग्रामीण भागांमध्ये स्वयं मदत गट यांच्या मूलभूत आर्थिक गरजांसाठी एक नवीन सिस्टम मान्यता आली ती म्हणजे एक स्टॉप सोल्युशन किंवा सिंगल विंडो सिस्टम.
 • ही सर्व केंद्रे प्रशिक्षित SHG नेटवर्कद्वारे ठरवले जातात.

ग्रामीण योजनेतील प्रमुख घटक

 • तीन वर्षामध्ये २०१७ पर्यंत१० लाख ग्रामीण तरुणांना प्रशिक्षित करणे
 • या योजने अंतर्गत सहभागी होण्यासाठी कमीत कमी वय १५ वर्षे व संपूर्ण कौशल्य कार्यक्रमात सहभागी  होण्यासाठी कमीत कमी वय वर्ष १८ असावे.
 • ग्रामीण भागातील बेरोजगारीच्या समस्येचे समाधान करण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात येत आहे.
 • या योजनेअंतर्गत देण्यात येणारे कौशल्य आता आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे असेल, जे प्रधानमंत्री मेक इन इंडिया अभियानाच्या पूरक असेल.
 • कौशल्य योजनेत अपंगांचे प्रशिक्षण लक्षात घेण्यात आले असून ग्रामीण तरुणांमध्ये कौशल्य विकासासाठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांसहित खाजगी क्षेत्रातील कंपन्याही सहभागी करण्यात आल्या आहेत.

शहरी योजनेतील प्रमुख घटक

शहरी भागासाठी दीन दयाल उपाध्याय अंत्योदय योजने अंतर्गत सर्व ४०४१ शहरे समाविष्ट करण्यात येणार असून सुरुवातीस शहरी गरिबी उच्चाटन कार्यक्रमांतर्गत फक्त ७९० शहरांचा समावेश करण्यात आला आहे.

 • प्रत्येक शहरी गरिबावर १५००० रु. ते १८००० रु. खर्च करून त्यास कौशल्य पूर्ण बनविण्यात येईल.
 • सुक्ष्म उद्योग व समुह उद्योग स्थापने अंतर्गत स्वरोजगार वाढीस चालना देण्यात येईल. यामध्ये व्यक्तीगत व्यवसायासाठी २ लाख रुपये, व्याज अनुदान व समूह उद्योगासाठी १० लाख रुपये व्याज अनुदान देण्यात येते. अनुदान असणारे व्याजदर ७% असेल.
 • शहरी कौशल्य केंद्रामार्फत शहरी कौशल्य मागणी पूर्ण करण्यासाठी प्रत्येक केंद्रास १० लाख रुपये भांडवली अनुदान देण्यात येते.
 • शहरी गरिबांना स्वयं-सहाय्यता गटापासून वित्तीय आणि सामाजिक गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम बनविण्या प्रत्येक गटास १० हजार रुपये सहायता देण्यात येत आहे.
 • शहरी बेघर असणाऱ्यांसाठी काय स्वरुपी घरांची निर्मिती व इतर गरजेच्या सेवांना प्राधान्य देणे.

योजनेबद्दल थोडेसे

 • ही योजना ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांची गरिबी तसेच असुरक्षितता कमी करण्यावर भर देते
 • 24 सप्टेंबर 2013 साली देशाच्या गृहनिर्माण आणि शहरी गरीब निर्मूलन मंत्रालय याद्वारे राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियानाला सुरुवात केली.
 • लोकांना कौशल्य विकास देऊन त्यांना रोजगाराकडे नेणे तसेच छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी सहज कर्ज मिळावे यासाठी स्वयंरोजगार उपक्रम चालू करण्याचे उद्दिष्ट.
 • ही योजना एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये तसेच शहरांमध्ये राबविण्यात येणार आहे.
 • ग्रामीण आणि शहरी भागामधील दारिद्र्य रेषेखालील गरिबांना म्हणजेच झोपडपट्टीत राहणारे कचरा वेचणारे बेघर आणि रस्त्यावर विक्री करणारे लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट.

राष्ट्रीय शहरी आजीविका अभियान वैशिष्ट्ये |Deen Dayal Upadhay Antyodaya Yojana

 • या योजनेद्वारे सोशल मोबिलायझेशन आणि संस्थांचा विकास केला जाणार आहे
 • गरीब लोकांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये क्षमता निर्माण करणे
 • कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना प्लेसमेंटद्वारे रोजगार निर्माण करून देणे
 • स्वयंरोजगार कार्यक्रम करणे
 • शहरातील विविध रस्त्यांवरील विक्रेत्यांना समर्थन करणे
 • या योजनेसाठी नवीन आणि विशेष प्रकल्प तयार करणे
 • शहरांमधील बेघर लोकांसाठी निवारा योजना करणे

दीनदयाल अंत्योदय योजना 2023 पात्रता :

 • अर्जदार भारतीय रहिवासी असणे आवश्यक आहे.
 • अर्जदार गरीब असणे आवश्यक आहे.
 • ग्रामीण तसेच  शहरी भागातील गरीब लोक  या योजनेत सामील होऊ शकतात.

दीनदयाल अंत्योदय योजना 2023 कागदपत्रे:

 • आधार कार्ड
 • ओळखपत्र
 • पत्त्याचा पुरावा
 • मतदार ओळखपत्र
 • मोबाईल नंबर
 • पासपोर्ट आकाराचा फोटो

अधिक माहितीसाठी क्लिक करा-

दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजना ऑनलाईन अर्ज Deendayal Antyodaya Yojana online application

ऑनलाइन अर्ज: देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब लोक ज्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करायचा आहे, त्यांनी खाली दिलेल्या स्टेप करा.

 • प्रथम अर्जदाराने अधिकृत वेबसाइटला द्यावी .मुख्यपृष्ठ आपल्या समोर उघडेल.
 • या Home पेजवर तुम्हाला Login चा पर्याय दिसेल, तुम्हाला या Option क्लिक करावे लागेल, त्या पर्यायावरClick केल्यानंतर संगणकाच्या स्क्रीनवर तुमच्यासमोर पुढील पेज उघडेल.
 • या पेजवर तुम्हाला लॉगिन फॉर्म दिसेल, तुम्हाला या लॉगिन फॉर्मच्या खाली Register चा पर्याय दिसेल.
 • तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल. Option क्लिक केल्यानंतर पुढील पानावर नोंदणी फॉर्म उघडेल.
 • तुम्हाला या ऑनलाइन अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल जसे की नाव, नाव, ईमेल आयडी, पासवर्ड, संपर्क क्रमांक, सुरक्षित कोड इ.
 • माहिती भरल्यानंतर, तुम्हाला नवीन खाते तयार करा वर Click करावे लागेल.
 • त्यानंतर तुम्ही आता या लॉगिनमध्ये नोकरीसाठी अर्ज करू शकता आणि आजीविका ग्रामीण एक्सप्रेस योजना UPSC अंतर्गत दिलेल्या प्रोत्साहनासाठी अर्ज करू शकता.

अधिकृत संकेतस्थळासाठी येथे क्लिक करा (NULM)

दीनदयाल अंत्योदय योजनेच्या PDF साठी येथे क्लिक करा (NRLM)

दीनदयाल अंत्योदय योजनेच्या PDF साठी येथे क्लिक करा (NULM)

योजनेची संपर्क साधण्यासाठी चा पत्ता : Deendayal Antyodaya Yojana – National Rural Livelihoods Mission (DAY-NRLM) Ministry of Rural Development – Govt. of India 7th Floor, NDCC Building -II, Jai Singh Road New Delhi – 110001

या योजनेचा फोन नंबर : 011 – 23461708

FAQ

 1. दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजना कधी सुरू झाली ?
  भारत सरकारने 25 सप्टेंबर 2014 रोजी शहरी आणि ग्रामीण गरीबांसाठी दीनदयाल उपाध्याय अंत्योदय योजना सुरू केली. कौशल्य विकास आणि इतर उपायांद्वारे उपजीविकेच्या संधी वाढवून शहरी आणि ग्रामीण गरिबी कमी करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
 2. राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाचे नवीन नाव काय आहे?
  NRLM चे नाव बदलून DAY-NRLM (दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान) असे करण्यात आले.

आमच्या साइटवरील इतर पोस्ट सुद्धा वाचा…

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) Ayushman Bharat Yojana PM Jan Arogya 2023 in Marathi

आता काढा फक्त 436 रुपयांमध्ये दोन लाखांचा विमा |

Pandit Dindayal Swayam Yojana 2023

प्रधानमंत्री जनधन योजना

राष्ट्रीय पोशन अभियान

राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती योजना

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

Leave a comment