पोल्ट्री फार्म व्यवसायासाठी 50% सबसिडीवर 50 लाखांचे कर्ज! केंद्र सरकारने राबवली भन्नाट योजना; Poultry Farm Business Full Details and Benifits Read Now

Poultry Farm Business: ग्रामीण भागामध्ये नव्याने पोल्ट्री फार्म ची उभारणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून 50 टक्के सबसिडी सह या ठिकाणी 50 लाखांचे कर्ज सुद्धा उपलब्ध करून दिले जात आहे. परंतु बहुतांश शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ नक्की कसा मिळवायचा? तसेच कोणकोणते नागरिक यासाठी पात्र आहेत? आणि अर्ज प्रक्रिया इत्यादी बाबींविषयी माहितीच नसते त्यामुळे आजचा लेखामध्ये आपण याविषयी अगदी तपशील आणि सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. Poultry Farm Business in marathi

Poultry Farm Business
Poultry Farm Business

कुक्कुटपालनासाठी किती जमीन आवश्यक आहे ?, कुक्कुट पालन कसे करावे ? poultry farm profit, profit in poultry farming, is poultry farm profitable, chicken farm business, poultry business profitable in marathi

एक वर्षात मिळाले एवढे अंड्यांचे उत्पादन.

केंद्र सरकारने राबवलेल्या पशुसंवर्धन तसेच दुग्धविकास खात्याच्या माध्यमातून राष्ट्रीय पाळीव प्राची कार्यक्रम या ठिकाणी राबविण्यात येतो तसेच केंद्र सरकारने देशभरातील दूध माऊस अंड्याच्या उत्पादनात चांगल्या प्रकारे वाढवावी या हेतूने ही योजना राज्यभरात राबवली गेली आहे (poultry farm scheme in maharashtra). 2022-2023 या आर्थिक वर्षांमध्ये बघितले तर भारत देशात 230 अब्ज अंड्यांचे उत्पादन या ठिकाणी झाले आहे; केंद्र सरकारला हे उत्पादन अजूनही यामध्ये वाढवायचे आहे.

पोल्ट्री फार्मसाठी काय आहे ही योजना? Poultry Farm Business

ग्रामीण विभागामध्ये पोल्ट्री फार्म विकसित व्हावे यासाठी 50 लाखांपर्यंतचे कर्ज सरकार देत आहे (poultry farm subsidy); यावर 50% सबसिडी सुद्धा देत असून तुम्ही जर 50 लाखांचे कर्ज घेतले तर तुम्हाला थेट 25 लाख सबसिडी मिळणार आहे आणि 25 लाख रुपये यांचे रक्कम तुम्हाला परत करावी लागेल ते पैसे संबंधित बँकेमध्ये दोन हप्त्यात जमा केले तरी चालतील.

पोल्ट्री फार्मसाठी कर्ज कोणाला मिळू शकतं?

या योजनेच्या माध्यमातून कोणतीही व्यक्ती, उद्योजक, बचत गट, शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी कंपनी, शेतकरी उत्पादक संस्था, कायद्याच्या कलम आठ अंतर्गत स्थापन झालेल्या संस्था—यापैकी कोणालाही या माध्यमातून कर्ज मिळत आहे; तसेच योजनेसाठी कोणतेही राष्ट्रीयकृत बँक आपल्याला कर्ज देते.

आमच्या साइटवरील इतर पोस्ट सुद्धा वाचा

पोल्ट्री फार्मच्या कर्जासाठी अर्ज कसा करायचा?

पोल्ट्री फार्मच्या कर्जासाठी अर्ज सादर करत असताना आपल्याला ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून दिली आहे; यासाठी सरकारने खास राष्ट्रीय पाळीव पशु मिशन पोल्ट्री आपल्यासाठी सुरू केले आहे. या योजनेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर कर्ज घेणाऱ्या नागरिकाच्या नावावर कमीत कमी एक एकर क्षेत्रफळ असावी तसेच संबंधित कागदपत्र अर्जाला जोडणे बंधनकारक असेल. जर तुमची स्वतःची जमीन नसेल तर अशावेळी लीज वर घेतलेल्या जमिनीवरही आपल्याला कर्ज उपलब्ध करून घेता येते. परंतु अशा वेळेस हे कर्ज तुम्ही आणि जमिनीचे मालक या दोघांच्या नावाने आपल्याला घेता येतो?

या योजनेच्या माध्यमातून कर्ज घ्यायचे असेल तर सर्वात प्रथम सविस्तर प्रकल्प अहवाल आपल्याला सादर करावा लागतो. पोल्ट्री फार्मची योजना नक्की काय आहे हे यामध्ये विशद करावे लागेल तसेच हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने पोर्टलवर तुम्ही अपलोड करू शकता.

पोल्ट्री फार्मच्या कर्जासाठी कोणती कागदपत्रं लागतात ?

सविस्तर प्रकल्प अहवाल, जमिनीची कागदपत्रे, आधार कार्ड, पोल्ट्री फार्म उभाराचे आहे त्या जागेचे फोटो, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र तसेच ज्या बँकेच्या माध्यमातून तुम्ही कर्ज उपलब्ध करून घेणार आहात, त्या बँकेच्या खात्याचे पासबुक झेरॉक्स, आवश्यक फॉर्म, रहिवासी दाखला, तुमचे खाते असलेले बँकेचे दोन कॅन्सल चेक, कौशल्य प्रमाणपत्र, स्कॅन सही इत्यादी कागदपत्रांची जुळवाजुळुक आपल्याला करावी लागेल आणि अर्ज सादर करावा लागेल.

अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ:

एकदा की कागदपत्राची सुरुवात झाली तर नॅशनल लाईव्ह स्टॉक पोर्टल वर जाऊन आपल्याला युजर आयडी तसेच पासवर्ड बनवता येणार आहे; त्यासाठी आपल्याला (http://nlm.udayanidhimitra.in/Login) या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. परंतु सादर केल्यानंतर तुमचा अर्ज नक्की कोणत्या स्टेजवर पोहोचला आहे याची माहिती सुद्धा आपल्याला या पोर्टलच्या माध्यमातून मिळते.

पोल्ट्री फार्मच्या कर्जासाठी अर्ज करताना काय काळजी घ्याल ?

वेबसाईटच्या माध्यमातून लॉगिन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर तुमच्या मोबाईल वरती सर्वात प्रथम ओटीपी येणार आहे. आपली सगळी कागदपत्रे अगदी व्यवस्थित असले पाहिजेत. याची काळजी घेण्याबद्दल कारक आहे, तसेच नक्की किती तुम्हाला कर्ज हवी आहे हे त्या ठिकाणी नमूद करावे. तुमचा प्रकल्पाचा अहवाल सर्वात महत्त्वाचा आहे; तो सादर करावा लागेल. यामध्ये नेमक्या किती कोंबड्या तुम्ही पाहणार आहे तसेच त्यांच्या पानासाठी नक्की किती खर्च येणार आहे याची आकडेवारी त्या ठिकाणी द्यायचे आहे. तसेच त्या कोंबड्यांना खाऊ, पिऊ, घालण्यासाठी नक्की किती खर्च लागेल याची नीट माहिती तेथे द्यावी लागेल, तसेच सर्व माहिती अगदी खरी असावी याची पडताळणी घ्यावी.

सिबील स्कोर गरजेचा ?

केदार सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या या योजनेच्या अंतर्गत पोल्ट्री साठी कर्जाचा लाभ आपल्याला घ्यायचा असेल तर अशावेळी तुमचा जो काही सिबिल स्कोर आहे तो चांगला असावा; सिबिल स्कोर चांगला असल्यास बँका कर्ज देण्यास लगेच तयार होत आहेत. तसेच, कर्जाचा प्रस्ताव आपला अजिबात नाकारला जात नाही.

व्यवसायासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता:

कुक्कुटपालन करण्यासाठी प्रशिक्षणाचे आवश्यकता आपल्याला घ्यावी लागेल. हा व्यवसाय नक्कीच जोखीम्स आहे यामुळे या व्यवसायात उतरताना सर्वात प्रथम आपल्याला या व्यवसायाची माहिती प्रशिक्षण घेणे खूपच गरजेचे आहे. कोंबड्यांचे संगोपन त्यांची व्यवस्थितरीत्या निगा कशी राखावी त्यांच्या संपूर्ण आरोग्याचे व्यवस्थापन, रोग आणि आजार झाले असतील तर त्यावर कोणत्या उपाययोजना कराव्यात, कोंबड्यांचे खाद्याचे व्यवस्थापन, इत्यादी बाबींची माहिती आपल्याला असावी.

या कर्जासाठी स्थानिक भागात कोणाला संपर्क करावा लागेल ?

केंद्र सरकारच्या माध्यमातून ही योजना राबवली जात आहे तरी ही योजना राबवण्यासाठी राज्य सरकार नोडल एजन्सी कार्यरत आहे। ऑनलाइन अर्ज केला तरी सुद्धा तुमचे अर्ज याच मॉडल एजन्सीच्या माध्यमातून बँकांना पर्यंत पोहोचवली जाणार आहेत। अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या कृषी संवर्धन अधिकाऱ्यांशी पशुसंवर्धन अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता, तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी त्यांच्याकडून मदत घेऊ शकता।

Leave a comment