महिला सन्मान बचत पत्र योजना 2023 मराठी जाणून घ्या- लाभ, व्याजदर, अर्ज प्रक्रिया कशी असेल| Mahila Samman Bachat Patra Yojana

मित्रांनो आजही तुमच्यासाठी नेहमीप्रमाणेच एक नवीन योजनेची माहिती आणलेली असून ही योजना म्हणजे महिलांच्या सशक्तिकरण आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणली गेलेली आहे. | Mahila Samman Bachat Patra Yojana , Mahila Samman Bachat Patra Yojana 2023, Mahila Samman Bachat Patra Yojana in Marathi, Mahila Samman Bachat Patra Yojana benefits, mahila samman savings certificate

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now
Mahila Samman Bachat Patra
Mahila Samman Bachat Patra

आपल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याच वर्षी म्हणजेच 1 फेब्रुवारी 2023 ला संसदेमध्ये केंद्रीय अर्थसंकल्प 2023 -24 सादर करण्याच्या वेळीच महिलांसाठी एक भेट म्हणून महिला सन्मान बचत पत्र योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे.

या योजनेद्वारे आपल्या देशातील महिलांना बचत करता येईल व त्यावर व्याजही मिळेल.

या योजनेद्वारे महिला आहेत त्यांच्या व मुलींच्या नावाने बचत गुंतवून चांगले व्याज मिळवू शकतात.

जर तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही हा लेख संपूर्ण वाचा.

या लेखामध्ये तुम्हाला महिला सन्मान बचत पत्र मध्ये किती पैसे जमा करता येतील? तसेच हे बचत पत्र म्हणजे काय? यावर किती व्याजदर मिळेल? ही सर्व माहिती आज तुम्हाला भेटणार आहे. हे देखील वाचा: लेक लाडकी योजना 2023, सर्व माहिती 

महिला सन्मान बचत पत्र तपशील : | Mahila Samman Bachat Patra Yojana

नाव महिला सन्मान बचत पत्र
श्रेणीकेंद्र सरकार योजना
घोषणाअर्थमंत्री सीतारामन द्वारे
वर्ष1फेब्रुवारी 2023
उद्दिष्टमहिला आणि मुलींना बचतीवर 7.5 टक्के दराने व्याज देणे
लाभार्थीदेशातील महिला आणि मुली असणार आहेत.
अर्ज प्रक्रियाऑफलाइन
योजनेचा फॉर्मडाऊनलोड करा

महिला सन्मान बचत पत्र योजना 2023 | Mahila Samman Bachat Patra Yojana

 • मित्रांनो १ फेब्रुवारी 2023 ला 2023- 24 चा अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केलेली होती.
 • देशातील महिला आणि मुलींना बचतीचे जास्तीत जास्त फायदे देण्यासाठी महिला सन्मान बचत पत्र योजना सुरू करण्याची घोषणा केलेली होती.
 • महिला सन्मान बचत पत्राद्वारे दोन लाख रुपयापर्यंत तुम्ही बचत ही जमा करू शकता आणि याच बचतीवर तुम्हाला सरकारकडून साडेसात टक्के दराने व्याज मिळणार आहे.
 • तुम्ही जमा केलेली बचत ही दोन वर्षांसाठी जमा केले जाईल.
 • दोन वर्षांनंतर तुमची बचत केलेले सर्व रक्कम व्याजासहित तुम्हाला दिली जाईल.
 • ही योजना 2025 पर्यंत लागू असणार आहे
 • या योजनेमध्ये सर्व वयोगटातील महिला आणि मुली सुद्धा बचत पत्र खाते उघडू शकतात
 • ही योजना महिलांना पैसे वाचवण्यासाठी फायदेशीर असून या योजनेद्वारे थोडेफार पैसे काढता देखील येणार आहेत.
 • या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमची ठेव आणि त्यावरील व्याज हे संपूर्ण पैसे परत मिळतात.

आमच्या साइटवरील इतर पोस्ट सुद्धा वाचा

योजनेमध्ये किती पैसे जमा करता येतील? | Mahila Samman Bachat Patra Yojana

 • या योजनेमध्ये जास्तीत जास्त दोन लाख रुपयापर्यंत रक्कम जमा करता येऊ शकतात.
 • कमीत कमी रकमेबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नसून तज्ञांच्या मते एक हजार रुपयांनी हे खाते उघडता येईल.
 • बचत प्रमाणपत्रे खरेदी करण्यासाठी दोन वर्षांपर्यंतची मर्यादा निश्चित केली आहे.
 • या योजनेमध्ये देशातील कोणतीही मुलगी किंवा महिला 31 मार्च 2025 पर्यंत हे खाते उघडू शकते आणि जास्तीत जास्त व्याजदर मिळवू शकते.
 • ही योजना जेव्हा संपुष्टात येईल तेव्हा एकूण ठेवाने रक्कम तुम्हाला व्याजासह संपूर्ण रक्कम दिले जातील.

व्याजदरावरील परिणाम | Mahila Samman Bachat Patra Yojana Marathi

 • ही योजना चालू असताना जर व्याजदर बदलण्यात आला तर या बचत पत्रावर कोणताही परिणाम होणार नाही.
 • भारत सरकारद्वारे जेवढ्या लहान मोठ्या बचत योजना चालवल्या जातात तेवढ्यांचे व्याजदर हे तीन महिन्यां आधीच घोषित केले जातात मात्र या बदललेल्या दराचा या योजनेवर काहीही परिणाम होणार नाही.
 • म्हणजेच तुम्ही जमा केलेल्या पैशांवर तुम्हाला हमी परतावा मिळेल. हे देखील वाचा: किशोरी शक्ती योजना 2023, खास मुलींसाठी

जलद परतावा | Mahila Samman Bachat Patra Yojana

या बचत पत्राद्वारे तुम्हाला फक्त दोनच वर्षात चांगले व्याजदर मिळेल म्हणजेच सुकन्या समृद्धी योजने मध्ये मुलीच्या लग्नाच्या वेळी 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर किंवा सुरू असताना तसेच PPF खात्यामध्ये सुद्धा 15 वर्षे वाट पहावी लागते मात्र या योजनेमध्ये असे असे काहीही होणार नाही.

1 एप्रिल 2023 चे नवीन अपडेट | Mahila Samman Bachat Patra Yojana New Updates

 • तुम्हाला तुमच्या घराजवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये 3 एप्रिल 2023 पासून महिला सन्मान बचत योजनेचे खाते उघडता येईल.
 • दळणवळण मंत्रालयाचे सहाय्यक संचालक माननीय देवेंद्र शर्मा यांनी हे पत्र जाहीर केले आहे.
 • या पत्रातील अधिसूचनेनुसार या योजनेतील व्याज हे तिमाही आधारावर चक्रवाढ केले जाणार आहे.
 • योजनेनुसार एक वर्षांनंतर ठेव रकमेमधून जास्तीत जास्त तुम्हाला 40% रक्कम काढता येईल.
 • या योजनेमध्ये योजनेच्या मॅच्युरिटीच्या आधीच हे खाते बंद करता येणार नाही.
 • जर खाते बंद झाले तर तुम्हाला 7.5 % व्याज मिळणार नाही तर 5.5 % व्याज मिळेल.

योजनेची वैशिष्ट्ये आणि फायदे

 • या योजनेची घोषणा 1 फेब्रुवारी 2023 ला झालेली असून तीन एप्रिल 2023 पासून खाते पोस्ट ऑफिस मध्ये उघडता येईल अशी घोषणा यापूर्वीच झालेली आहे.
 • योजनेसाठी कमीत कमी 1000 रुपयांचे खाते उघडता येईल.
 • योजनेसाठीची कालमर्यादा ही दोन वर्षांपर्यंतची आहे.
 • या योजनेच्या दोन वर्षांच्या काळापर्यंत तुम्ही जमा केलेल्या रकमेवर साडेसात टक्के व्याज देण्यात येईल.
 • या योजनेमार्फत तुम्हाला PPF, NSC यासारख्या योजना पेक्षा जास्त व्याजदर मिळेल.
 • तुमची रक्कम ही दोन वर्ष पर्यंत जमा असणार आहे आणि त्यानंतर सर्व रक्कम व्याज असं तुम्हाला परत भेटेल.
 • 31 मार्च 2025 पर्यंत कुठलीही महिला किंवा मुलगी हे खाते उघडू शकते.
 • या योजनेद्वारे महिलांच्या सक्षमीकरणाला चालना मिळेल.

अर्ज करण्यासाठी पात्रता | Mahila Samman Bachat Patra Yojana

 • या योजनेला अर्ज करण्यासाठी तुमचे वय हे कमीत कमी 18 वर्षे पूर्ण असायला हवे.
 • या योजनेसाठी कमीत कमी एक हजार रुपये देऊन अकाउंट खोलू शकता.
 • जास्तीत जास्त दोन लाखांपर्यंत पैसे जमा केले जाऊ शकतात.
 • मध्येच खाते बंद करता येणार नाही.
 • खाते जर बंद करायचेच असेल तर त्याला कमीत कमी सहा महिने पूर्ण व्हायला हवेत.

योजनेसाठी ची आवश्यक कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • ओळखपत्र
 • रहिवासी प्रमाणपत्र
 • रेशन कार्ड
 • मोबाईल नंबर
 • पासपोर्ट साईज फोटो

योजनेसाठी अर्ज कसा करावा | Mahila Samman Bachat Patra Yojana

 • तुम्ही या योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी तुमच्या घराजवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन या योजनेसाठी फ्री मध्ये अकाउंट खोलू शकता
 • इतर बँकांमध्ये सुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल –
 • पंजाब नॅशनल बँक
 • कॅनरा बँक
 • युनियन बँक
 • बँक ऑफ बडोदा
 • बँक ऑफ इंडिया
 • बँकेमध्ये खाते खोलण्यासाठी तुमचा पासपोर्ट साईज रंगीत फोटो घेऊन जा तसेच इतर जे कागदपत्रे लागतील ते सुद्धा घेऊन जा.
 • हे खाते खोलताना तुम्हाला योजनेचा फॉर्म भेटेल तो फॉर्म व्यवस्थित भरा आणि त्याला आवश्यक कागदपत्रे जोडा

तसेच तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन या योजनेचा फॉर्म डाउनलोड सुद्धा करू शकता

योजनेचा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

FAQ

महिला सन्मान बचत पत्रावर किती व्याज मिळेल ?

या योजनेमध्ये सरकारद्वारे 7.5 % व्याज मिळणार आहे

महिला सन्मान बचत पत्र मध्ये सहभागी कसे व्हावे ?

जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन बँक खाते खोलून आवश्यक ती माहिती आणि कागदपत्रे सबमिट करावे.

महिला सन्मान बचत पत्र योजनेमध्ये किती गुंतवणूक करता येते ?

महिला बचती अंतर्गत कमीत कमी दोन लाखापर्यंतचे गुंतवणूक करता येते.

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

Leave a comment