Land Map Online : फक्त गट नंबर टाकून मोबाईलवरच डाउनलोड करा शेत जमिनीचा नकाशा: पुढील स्टेप्स फॉलो करा;

Land Map Online : शेती करत असताना फक्त शेतीकडे लक्ष न देता तितकेच लक्ष. शेती संबंधित असलेल्या कागदपत्रांकडे देणे गरजेचे आहे कारण की कागदपत्रे जर गहाळ झाली तर मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच, कागदपत्रे जर व्यवस्थित रित्या क्लिअर नसतील तर अशावेळी आपल्याला त्याच क्षेत्राबाबत विविध समस्या निर्माण होऊ शकतात.

Land Record Check Online, land survey maps online maharashtra, land record maharashtra, Land Survey Maps Online Maharashtra marathi

Land Map Online
Land Map Online

अशावेळी शेतीशी निगडित जी काही आवश्यक कागदपत्रे आहेत, म्हणजेच सातबारा आठ अ खाते उतारा. या सोबतच शेत जमिनीचा नकाशा, तसेच इतर महत्त्वाची कागदपत्रे आपल्याजवळ असली तर आपण बिनधास्तपणे शेतीकडे लक्ष केंद्रित करून चांगले तळणे शेती करू शकतो. जर कागदपत्रे क्लियर नसतील तर सर्वात प्रथम शेतातील काम सोडून त्या कागदपत्रांच्या क्लिअर करण्याकडे लक्ष द्यावे. कारण ते फार महत्त्वाचे आहे. तर चला, आजच्या लेखामध्ये आपण याच संबंधित एक महत्त्वाची बातमी जाणून घेणार आहोत.:

अलीकडे शेत जमिनीची विविध कामे आपल्याला ऑनलाइन पद्धतीने झाल्याचे पाहायला मिळतील. अशावेळी सातबारा उतारा काढण्यापासून बघितले तर जमिनीची इतर महत्त्वाची कामे सुद्धा अगदी घरबसल्या तुम्हाला करता येणार आहेत. मोबाईलच्या द्वारे कॉम्प्युटरच्या द्वारे तुम्ही ही कामे कमी वेळेत कमी खर्चात पार पाडू शकतात.

त्यामुळे तुम्हाला सातत्याने शासकीय कार्यालयाच्या चकरा मारायची अजिबातच आवश्यकता भासणार नाही, कारण की ऑनलाईन बाबींच्या माध्यमातून तुम्हाला घरबसल्या या गोष्टी मिळवता येणार आहेत. तसेच, यासाठी तुमचा पैसा खर्च होणार नाही. तसेच, कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त काम करण्यास चांगली मदत होणार आहे. तर चला, आज आपण सरकारच्या एका डिजिटल सुविधा विषयी माहिती जाणून घेऊया.

शेत जमिनी बाबतची ही आहेत आवश्यक कागदपत्रे.

शेतकरी वर्गासाठी शेत जमिनीचा नकाशा, तसेच सातबारा व इतर आवश्यक कागदपत्रे खूपच महत्त्वाचे असतात. कारण की जमिनीच्या हळदी आपल्याला या माध्यमातूनच समजतात. तसेच, जमिनीचे बांध रस्ता यामुळे वादविवाद होत असतील तर अशावेळी सातबारा उतारा यासोबत आठ अ खाते उतारा आपल्याला जितका महत्वाचा वाटतो तितकीच महत्त्वाचे आहे. जमिनीचा नकाशा या माध्यमातून आपल्याला हत्ती रस्ता आणि शेजारील शेतकऱ्यांच्या बाबी अशा नोंदणी घेता येतात. यासाठी शेतकऱ्यांकडे स्वतःच्या मालकीच्या शेत जमिनीचा आशा असणे खूप गरजेचे आहे. नकाशा असेल तर आपण कधीही या बाबी सर्वांसमोर मांडू शकतो.

यासोबतच तुम्हाला जो काही जमिनीचा नकाशा आहे तो अगदी कशाप्रकारे काढायचा, कोठे काढायचा, या संदर्भाबद्दल माहिती असणे खूपच गरजेचे आहे. जमिनीचा नकाशा काढायचा असेल तर तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाही. तुम्ही अगदी घर बसल्या, ऑनलाईन पद्धतीने सहजपणे मोबाईलच्या माध्यमातून किंवा कम्प्युटरच्या माध्यमातून शेत जमिनीचा रस्ता काढू शकणार आहे. सरकारने ही सुविधा आपल्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. तरी या सुविधेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा आणि आपल्या वेळेची आणि पैशांची बचत करावी. चला, तर मग आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेऊया नक्की कशाप्रकारे ऑनलाइन पद्धतीने शेत जमिनीचा नकाशा मोबाईल मध्ये डाऊनलोड करायचा.

Land Map Online Download जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा काढावा?

सर्वप्रथम गुगल वर किव्हा क्रोम वर जाऊन mahabhunakasha.mahabhumi.gov.in असं सर्च करा.

यानंतर, तुमच्या स्क्रीन वर एक नवीन पेज ओपन होणार आहे. यामध्ये तुम्हाला डाव्या बाजूला लोकेशन कॉलम दिसेल त्यामध्ये तुम्हाला तुमचं राज्य तसेच कॅटेगिरी यामध्ये रुरल एरिया आणि अर्बन एरिया असे दोन पर्याय दिसतील. जर अशावेळी तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर त्या ठिकाणी रुरल जर शहरी भागात तुम्ही वास्तव्य करत असाल तर अर्बन एरिया हा पर्याय निवडा.

यानंतर त्याठिकानीच तुमचा जिल्हा, तालुका आणि तुमचं गावाचे नाव निवड. नंतर व्हिलेज मॅप पर्याय वर क्लिक करा. आता तुमच्यासमोर त्याठिकाणी शेत जमीन ज्या गावांमध्ये आहे त्या गावाचा पूर्णपणे नकाशा दिसेल.

तुम्हाला हा नकाशा जर मोठ्या म्हणजे फुल स्क्रीन मध्ये पाहण्यासाठी होम या पर्यायासमोरील आडवा बाण दिसेल सर्वात प्रथम त्यावर क्लिक करा. येथे (+) चिन्ह वर क्लिक केल्यानंतर हा नकाशा मोठा होईल आणि (-) चिन्ह वर क्लिक केल्यानंतर हा संपूर्ण नकाशा लहान होईल.

आमच्या साइटवरील इतर पोस्ट सुद्धा वाचा

Leave a comment