महाराष्ट्र स्वाधार योजना 2023 ऑनलाईन फॉर्म, PDF अर्ज, पात्रता | Maharashtra Swadhar Yojana Read All Details, Download Online, Benefits

राज्यातील अनुसूचित जाती (SC) आणि नवबौद्ध प्रवर्ग (NT) विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र स्वाधार योजना 2023 सुरू केली आहे. | Maharashtra Swadhar Yojana

या योजनेंतर्गत 10वी, 12वी आणि डिप्लोमा आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अभ्यासासाठी आणि निवास, बोर्डिंग आणि इतर सुविधांसाठी राज्य सरकारकडून दरवर्षी 51,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.

महाराष्ट्र समाज कल्याण विभागा मार्फत ‘महाराष्ट्र स्वाधार योजना’ 2023 चालवली जाते.

Maharashtra Swadhar Yojana 2023 Application Form PDF Download Online, Benefits , Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana , Maharashtra Swadhar Yojana marathi

Maharashtra Swadhar Yojana
Maharashtra Swadhar Yojana

महाराष्ट्र स्वाधार योजना 2023 | Maharashtra Swadhar Yojana

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना या नावाने सुद्धा महाराष्ट्र स्वाधार योजना ही ओळखली जाते.

अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील मुलांना त्यांच्या उज्ज्वल भविष्या साठी कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण येऊ नये, आणि त्यांना आवडीच्या तसेच कोणत्याही क्षेत्रात अभ्यास करता यावा हा या योजनेचा उद्देश आहे.

या योजनेचा लाभ ११ वी, १२ वी, व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक (प्रोफेशनल व नॉन प्रोफेशनल कोर्स) अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

राज्य शासनाअंतर्गत या योजनेदवारे विद्यार्थ्यांना ५१ हजार रुपयांची रक्कम दिली जाणार आहे. जी  महाराष्ट्र समाज कल्याण विभागाने जारी केली आहे.

ठळक मुद्दे | Highlights

योजनेचे नाव महाराष्ट्र स्वाधार योजना
सुरुवात             महाराष्ट्र सरकार
विभाग                        महाराष्ट्र समाज कल्याण विभाग
उद्देश                         विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे
लाभार्थी                       अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी
आर्थिक सहाय्य     51 हजार रुपये प्रत्येक वर्षी
अर्ज प्रक्रियाऑनलाइन
अधिकृत वेबसाईट       येथे क्लिक करा

महाराष्ट्र स्वाधार योजना 2023 चे उद्दिष्ट | Maharashtra Swadhar Yojana

  • तुम्हा सर्वांना माहीत आहे की, आर्थिकदृष्ट्या गरीब असल्यामुळे विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत.
  • म्हणून राज्य सरकारने महाराष्ट्र स्वाधार योजना 2023 सुरू केली आहे.
  • या योजनेंतर्गत, सरकार गरीब अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 11वी, 12वी, डिप्लोमा, व्यावसायिक आणि गैर-व्यावसायिक अभ्यास क्रमांसाठी प्रत्येक वर्षी 51,000 रुपये आर्थिक सहाय्य प्रदान करते.
  • या योजनेच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे, प्रोत्साहन देणे आणि विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल केले जाणार आहे.

आमच्या साइटवरील इतर पोस्ट सुद्धा वाचा

योजनेअंतर्गत मिळणारे फायदे | Maharashtra Swadhar Yojana

  • स्वाधार योजनेचा लाभ महाराष्ट्रातील ज्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत कमकुवत आहे अशा गरीब विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल.
  • बाबासाहेब भीमराव आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ अनुसूचित जाती, नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांना घेता येईल.
  • लाभार्थी विद्यार्थ्यांना निवास, भोजन आणि इतर खर्चासाठी सरकारकडून प्रतिवर्षी 51,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.
  • स्वाधार योजनेअंतर्गत, तुम्ही इयत्ता 11 वी आणि 12 वी मध्ये अभ्यास सुरू ठेवण्यासाठी अर्ज करू शकता.
  • आणि तुम्ही डिप्लोमा व्यावसायिक आणि गैर-व्यावसायिक (प्रोफेशनल व नॉन प्रोफेशनल कोर्स) अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्यास पात्र होऊ शकता.

योजनेचा लाभ घेण्यासाठी ६०% गुण अनिवार्य

या योजनेंतर्गत शासकीय वसतिगृहात प्रवेश दिला जाईल.

महाराष्ट्र जिल्ह्यातील जवळजवळ १७ शासकीय वसतिगृहांमध्ये या योजने अंतर्गत प्रवेश दिले जातील.

जिल्ह्यात सुमारे १७ शासकीय वसतिगृहे असून त्यात १४३५ विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केली आहे.

ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या वसतिगृहांमध्ये जागा मिळणार नाही त्यांच्या साठी निवासी शाळांची व्यवस्था करण्यात आली आहे.

2021-22 मध्ये 509 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला.

मागील काही वर्षामध्ये कोरोनाव्हायरस संसर्गामुळे या योजनेचा लाभ जास्त विद्यार्थ्यांना घेता आला नाही.

अटी | Maharashtra Swadhar Yojana

  • ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ६०% पेक्षा कमी गुण असतील त्यांना या योजनेचा लाभ भेटणार नाही.
  • वार्षिक एकूण उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असणे आवश्यक.
  • जर विद्यार्थी नवबौध प्रवर्गातील, दिव्यांग वर्गातील, किंवा अनुसूचित जाती जमाती मधील असेल तर त्याच्यासाठी किमान गुण ५०% निश्चित करण्यात आले आहेत.
  • याशिवाय एक्सप्लोरेशन आणि इंजिनीअरिंग शाखांच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी ५००० रुपये ठरवले आहेत.  आणि इतर शाखांच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्यासाठी रुपये २००० दिले जातील.

हे वसतिगृह शेगाव, खामगाव, जळगाव जामोदा, चिखली, दिऊळगाव राजा, नादुरा, बुलढाणा आणि मेहकर आशा अनेक ठिकाणी आहे.

पात्रता / निकष | Maharashtra Swadhar Yojana

  • या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या सर्व इच्छुक अर्जदारांनी दिलेले पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.
  • स्वाधार योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील कायमस्वरूपी रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांनाच घेता येईल.
  • केवळ अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि निओ बौद्ध श्रेणी (NP) मधील विद्यार्थी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.
  • या योजनेत फक्त 10वी, 12वी, डिप्लोमा आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद आहे.

महाराष्ट्र स्वाधार योजनेत खर्च करावयाची रक्कम

सुविधा  खर्च
बोर्डिंग सुविधा             28,000/-
निवास सुविधा15,000/-
विविध खर्च  8,000/-
वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे विद्यार्थीरु. 5,000/- (अतिरिक्त)
इतर शाखा2,000/- (अतिरिक्त)
एकूण       ५१,०००/-

आवश्यक कागदपत्रांची यादी आवश्यक कागदपत्रांची यादी Maharashtra Swadhar Yojana Documents

स्वाधार योजनेत ऑनलाइन नोंदणी करून तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे-

  • आधार कार्ड
  • जात प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • मार्कशीट – 10वी, 12वी किंवा डिप्लोमा
  • बँक पासबुक फोटोकॉपी (फक्त राष्ट्रीयीकृत बँका)
  • अधिवास प्रमाणपत्र
  • महाविद्यालयीन प्रमाणपत्र
  • महाविद्यालयाचे शाळेतील उपस्थिती प्रमाणपत्र
  • प्रतिज्ञापत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

महाराष्ट्र स्वाधार योजना 2023 साठी अर्ज कसा करावा? | Maharashtra Swadhar Yojana

महाराष्ट्रातील ज्या लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत ऑनलाइन नोंदणी करायची आहे त्यांनी खाली दिलेल्या पद्धतीचा अवलंब करावा.

  • स्वाधार योजनेच्या ऑनलाइन नोंदणीसाठी, सर्वप्रथम अर्जदाराला महाराष्ट्र समाज कल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
  • अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • नंतर मुख्यपृष्ठ उघडेल.
  • येथे होम पेजवर तुम्ही स्वाधार योजना PDF वर क्लिक करा.
  • यानंतर अर्ज डाउनलोड करा.
  • डाउनलोड केलेल्या अर्जा त विचारलेली सर्व माहिती भरा.
  • सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला अर्जासोबत तुमच्या सर्व कागदपत्रांच्या छायाप्रती संलग्न कराव्या लागतील आणि त्या तुमच्या संबंधित समाज कल्याण कार्यालयात जमा कराव्या लागतील.

अशा प्रकारे महाराष्ट्र स्वाधार योजना 2023  चा अर्ज पूर्ण होईल.

FAQ

महाराष्ट्र स्वाधार योजना काय आहे ? 

अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील मुलांना त्यांच्या उज्ज्वल भविष्या साठी कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण येऊ नये, आणि त्यांना आवडीच्या तसेच कोणत्याही क्षेत्रात अभ्यास करता यावा हा या योजनेचा उद्देश आहे.

महाराष्ट्र स्वाधार योजनेचा PDF कसा डाऊनलोड करावा ?

या लेखा मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे, तसेच या योजनेचे PDF आपण अधिकृत वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकता.

महाराष्ट्र स्वाधार योजनेसाठी कोण पात्र आहेत ?

योजनेचा लाभ घेण्यासाठी ६०% गुण अनिवार्य तसेच वार्षिक एकूण उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असणे आवश्यक.

Leave a comment