जाणून घ्या महाराष्ट्र स्मार्ट रेशन कार्ड 2023 बद्दल संपूर्ण माहिती | Maharashtra Smart Ration Card All Benefits

मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र स्मार्ट रेशन कार्ड बद्दल यासंबंधीचे सर्व अपडेट तुम्हाला भेटतील. तसेच जे जे नागरिक महाराष्ट्र स्मार्ट रेशन कार्डचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी हा लेख संपूर्ण वाचा. Maharashtra Smart Ration Card , Benefits of Smart Ration Card in Maharashtra

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

ज्यामध्ये तुम्हाला पात्रता रेशन कार्ड वर नमूद केलेले तपशील बघण्यासाठी काही आवश्यक बाबी तसेच यासाठी अर्ज कसा करायचा हे सर्व मिळेल.

तसेच हा लेख शेवटपर्यंत वाचा म्हणजे तुम्हाला याबाबतीत सर्व माहिती मिळून तुमच्या सर्व शंका दूर होतील.

मित्रांनो रेशन कार्ड हे आपल्या देशामध्ये अति आवश्यक असा कायदेशीर प्रकारचा दस्तऐवज आहे जे आपल्याला एक प्रकारची ओळख देऊन आपल्या घराचा पत्ता हा कायदेशीर रित्या पडताळणीसाठी वापरले जाते.

डिजिटल इंडिया च्या बरोबरीने आपले राज्य सरकार हे रेशन वितरणामध्ये तंत्रज्ञान आणत आहे याचसाठी स्मार्ट रेशन कार्ड सुरू करण्यात आलेली आहेत.

स्मार्ट रेशन कार्ड या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट हे असणार आहे की आपल्या आसपासच्या गरीब लोकांना कमी किमतीत अन्न धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू पुरवणे आणि रेशन कार्ड लाभार्थ्यांना या सर्व गोष्टींचा मोफत लाभ घेता येणे हा आहे.

या नवीन स्मार्ट रेशन कार्डचा अर्ज जर तुम्हाला हवा असेल तर तो तर तो अधिकृत संकेतस्थळा वरून mahafood.gov.in डाऊनलोड करता येईल.

आपण आता या अर्जासोबत महाराष्ट्र स्मार्ट रेशन कार्ड कसे मिळवता येईल यासाठी ची प्रोसेस ही तपशीलवार पाहू.

Maharashtra Smart Ration Card
Maharashtra Smart Ration Card

महाराष्ट्र स्मार्ट रेशन कार्ड |Maharashtra Smart Ration Card

महाराष्ट्र स्मार्ट रेशन कार्ड साठी महाराष्ट्र अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग हे अर्ज स्वीकारत आहेत

महाराष्ट्र सरकारच्या डिजिटल सेवा यांचा वापर करून तुम्ही स्मार्ट रेशन कार्ड साठी अर्ज करू शकता इच्छुक लोकांनी mahafood.gov.in वर ऑनलाईन अर्ज सबमिट करा.

या नवीन डिजिटल रेशन कार्ड मध्ये तुमच्या कुटुंबाचे नाव कुटुंबप्रमुखाचे चित्र अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे तसेच या रेशन कार्ड मध्ये बारकोड सुद्धा समाविष्ट केला गेला आहे.

योजनामहाराष्ट्र स्मार्ट रेशन कार्ड
सुरुमहाराष्ट्र सरकार
विभागअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील पात्र नागरिक
श्रेणीराज्य सरकारी योजना
उद्देश्यया प्रकल्पाची प्रमुख उद्दिष्ट ही कुटुंबातील लाभार्थी यांना वाजवी दरात अन्नधान्य आणि इतर गरजा पुरवणे हे आहे.
राज्यमहाराष्ट्र
वर्ष2023
अधिकृत वेबसाईटmahafood.gov.in
Maharashtra Smart Ration Card marathi
Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

स्मार्ट रेशन कार्ड चे उद्दिष्ट |Maharashtra Smart Ration Card

  • या प्रकल्पाची प्रमुख उद्दिष्ट ही कुटुंबातील लाभार्थी यांना वाजवी दरात अन्नधान्य आणि इतर गरजा पुरवणे हे आहे.
  • या योजनेचा प्रमुख उद्देश हा आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला स्मार्ट रेशन कार्ड मिळायला हवे.
  • या स्मार्ट रेशन कार्ड मुळे सर्व कुटुंबांना वेळेवर रेशन मिळायला हवे.
  • जनतेची भ्रष्टाचार आणि लाचखोरी तसेच रेशन वाटप वेळी ठेलेदारां कडून जे अन्नधान्य चोरी होते यातून मुक्तता व्हायला हवी.
  • या स्मार्ट कार्डवर क्यू आर कोड असल्या कारणामुळे भ्रष्टाचार रोखण्यास मदत होईल.

तीन रंगातील स्मार्ट रेशन कार्ड |Maharashtra Smart Ration Card

महाराष्ट्र सरकारने तिरंगा स्मार्ट रेशन कार्ड अशा प्रकारचा कार्यक्रम सुरू केलेला असून वेगवेगळे वर्गवारीत येणाऱ्या कुटुंबांना वेगवेगळे रंग वितरित केले जाणार आहेत.

  • केशरी रेशन : कार्ड हे वार्षिक उत्पन्न 15,000 पेक्षा जास्त व 1 लाख पेक्षा कमी असलेल्या कुटुंबांना दिले जाणार आहे.
  • पिवळे रेशन : कार्ड हे केवळ दारिद्र्यरेषे खालील कुटुंबांना देण्यात येणार आहे ही वर्गवारी (बीपीएल) प्रकारची असते.
  • पांढरे रेशन कार्ड : हे कमीत कमी एक लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना देण्यात येणार आहेत.

स्मार्ट रेशन कार्ड साठी निकष आणि पात्रता |Maharashtra Smart Ration Card

स्मार्ट कार्ड साठी अर्ज करणाऱ्या कुटुंबांनी खालील पात्रता पूर्ण करायला हव्यात

  • IRDP मध्ये सूचीबद्ध असणारी आणि 15,000 पर्यंत वार्षिक उत्पन्न असलेले कुटुंब असावे.
  • कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींचा चार्टर्ड अकाउंटंट, वकील, डॉक्टर, आर्किटेक्ट यापैकी कोणताही परवाना नसावा.
  • कुटुंबाकडे निवासी फोन किंवा चार चाकी वाहन नसावे.
  • कुटुंबाकडे दोन हेक्टर पेक्षा जास्त जमीन नसावी (पावसावर अवलंबून असलेली), तसेच अर्ध हेक्टर सिंचन असलेली, किंवा एक हेक्टर जमीन अर्ध सिंचन असेही जमीन नसावी.
  • कुटुंबातील कोणतेही सदस्य हे व्यावसायिक करदाते, आयकरदाते किंवा GST करदाते, यातील कोणत्याही प्रकारचे कर भरण्यास पात्र नसावेत.
  • तसेच सरकारने सर्व विडी कामगार, कोल्हाटी, आणि पारधी या कुटुंबांना तात्पुरते बीपीएल रेशन कार्ड देण्याचे मान्य केले आहे.

स्मार्ट कार्ड अर्जासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रहिवासाचा पुरावा
  • मतदार ओळखपत्र
  • पासपोर्ट (मूळ प्रत)
  • पॅन कार्ड
  • वाहन चालविण्याचा परवाना
  • वीज बिल (पत्त्याचा पुरावा)

अर्ज करण्याची प्रक्रिया |Maharashtra Smart Ration Card

यासाठी तुम्हाला सर्वात आधी ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

  • वेबसाईटच्या होम पेजवर जा.
  • डाउनलोड लिंक शोधून त्यावर क्लिक करा.
  • अर्जाचा फॉर्म समोर दिसेल त्याची प्रिंट काढा.
  • सर्व आवश्यक माहिती भरा.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडून तो फॉर्म संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करा.
  • जमा केल्यानंतर ही प्रक्रिया 1 ते 2 महिन्यांपर्यंत सुरू असते.
  • रेशन कार्ड साठी अर्ज जास्त असतील तर प्रक्रियेस जास्त वेळ लागू शकतो.
  • तुम्ही जर अचूक अर्ज भरला आणि हे सर्व माहिती तुमच्या कागदपत्रांशी जुळत असेल तर तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकत नाही.

केलेल्या अर्जाचे स्टेटस तपासण्याची प्रक्रिया

  • मित्रांनो अर्ज केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल
  • Transparency Portal तिथे हा ऑप्शन शोधून Allocation Generation Status लिंकवर क्लिक करा.
  • आता तुम्ही नवीन पानावर जी माहिती विचारली असेल तिथे अचूकपणे माहिती भरा.
  • त्यानंतर Preceed या बटणावर क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी क्लिक करा

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

Leave a comment