आयुष्मान भारत योजना / प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) Ayushman Bharat Yojana PM Jan Arogya 2023 in Marathi

[आयुष्मान कार्ड ] प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 2023, क्या है, कब शुरू हुई, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे फायदे, रजिस्ट्रेशन कैसे करें, कार्ड कैसे बनवाएं, (Ayushman Bharat PM Jan Arogya Yojana in Marathi) (Kya Hai, Budget, List, Status, Kab Shuru hui, Ayushman Bharat Golden Card, Registration, Ayushman Card Download, Portal, Login, Eligibility, Hospital List, Check Name, Beneficiary List Download, PMJAY marathi

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेबद्दल. तर आज आपण याबद्दल माहिती घेऊ त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा. Ayushman Bharat Yojana

मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या घरातील जर कोणी आजारी पडले तर त्यांच्यावर दवाखान्यांमध्ये किती खर्च येतो.

तसेच आपल्या आसपासच्या परिसरातील सर्वच लोकांची आर्थिक स्थिती ही सारखीच नसते आणि त्यामुळे जे लोक गरीब आहेत किंवा त्यांच्याकडे पैसे नाहीत अशा लोकांच्या घरांमधील जर कधी कोणी आजारी पडले तर,

पैसे नसल्या कारणामुळे घरातील एखाद्याचा मृत्यू होतो किंवा कधी कर्ज मिळत नाही, तर कधी उपचारास उशीर होतो.

त्यासाठीच भारत सरकारने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही नवीन योजना आणलेली आहे या योजनेत अर्ज कसा करायचा आणि इतर सर्व माहिती आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.

Ayushman Bharat PM Jan Arogya Yojana in Marathi
Ayushman Bharat Yojana PM Jan Arogya in Marathi

कशी असणार आहे पंतप्रधान जन आरोग्य योजना Ayushman Bharat Yojana

Table of Contents

आपल्या भारत देशामध्ये दरिद्र रेषेखाली जे लोक येतात त्या लोकांसाठी सरकारने ही योजना सुरू केलेली आहे.

या योजनेमार्फत पाच लाखापर्यंतचा आरोग्य विमा दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना दिला जातो ज्यामुळे पैसे नसल्याकारणाने किंवा इतर कोणत्याही कारणामुळे ज्या लोकांना दवाखान्यात उपचार घेता येत नाही त्यांची मदत होईल.

या योजनेसाठी काही निवडक रुग्णालया आहेत या रुग्णालयांमार्फत पाच लाखा पर्यंतचा मोफत उपचार केला जातो.

या योजनेमुळे आजारी व्यक्तीला योग्य वेळी आणि वेळेमध्ये मोफत उपचार मिळेल त्यामुळे त्यांचे प्राण वाचू शकतील आणि त्यांच्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारच्या आर्थिक भार सोसावा लागणार नाही तसेच कोणत्याही प्रकारची पैशांची चिंता करावी लागणार नाही.

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे फायदे । Ayushman Bharat Yojana Benifits :

या योजनेमध्ये जवळजवळ दहा कोटी कुटुंबांचा समावेश करण्यात आलेला असून अजूनही 40 कोटी कुटुंबांना समाविष्ट करण्याचे उद्दिष्ट भारत सरकारचे आहे.

ज्या लोकांचा सामाजिक आर्थिक जनगणनेमध्ये समावेश आहे त्यांना या योजनेमध्ये घेतले गेलेले आहे.

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमार्फत पाच लाखापर्यंतचा आरोग्य विमा दिला जाणार आहे.

ही योजना जन आरोग्य योजना म्हणूनही ओळखले जाते जी आरोग्य मंत्रालयाद्वारे चालवली जात आहे.

या योजनेमध्ये औषधोपचार तसेच इतर खर्च शासन देणार असून १३५० हून अधिक आजारांवर उपचार केले जाणार आहेत.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी ची आवश्यक पात्रता :

या योजनेची पात्रता तपासण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी आयुष्यमान भारत या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.

या संकेतस्थळावर तुम्हाला एम आई एलिजिबल या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.

आता तुमच्या स्क्रीनवर एक नवीन विंडो उघडलेली असेल त्यामध्ये लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून OTP टाकावा लागेल.

यामध्ये तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या कुटुंबाची पात्रता तपासण्यासाठी यादी तुम्हाला राज्य निवडावे लागेल.

त्यानंतर दुसऱ्या पर्यायांमध्ये तीन रकाण्या मध्ये तुम्हाला तुमच्या शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड द्वारे मोबाईल नंबर मार्फत आणि नावाने शोधावे लागेल त्यासाठी कोणत्याही एका पर्यायावर क्लिक करा.

शेवटी तुम्हाला सबमिट बटन वर क्लिक करावे लागेल. आणि तुम्हाला संबंधित माहिती तुमच्या समोर दिसेल.

या योजनेसाठी तुम्ही जर पात्र असाल तर खालील दस्तऐवज किंवा कागदपत्रे तुम्हाला जोडावी लागतील.

  • कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड
  • शिधापत्रिका किंवा रेशन कार्ड
  • मोबाईल नंबर
  • तुम्ही जिथे राहत आहात त्या ठिकाणाचा किंवा पत्त्याचा पुरावा

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये रजिस्ट्रेशन म्हणजेच नोंदणी कशी कराल ?

या योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला वरती दिलेल्या सर्व कागदपत्र यांच्या झेरॉक्स घेऊन जवळच्या जनसेवा केंद्र मध्ये जायचे आहे.

तिथे गेल्यानंतर तुम्हाला तेथील कर्मचाऱ्यांना या योजनेसाठी अर्ज करायचा आहे असे सांगून तुमची कागदपत्रे त्यांना द्यावे लागतील.

अशाप्रकारे तुमची माहिती अधिकृत वेबसाईटवर रजिस्टर केले जाईल.

त्यानंतर तुमचे दस्तऐवज म्हणजेच कागदपत्रे स्कॅन करून ऑनलाईन अपलोड केले जातील.

आणि शेवटी तुमचा अर्ज सबमिट केला जाईल.

त्यानंतर दहा ते पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला जनसेवा केंद्रामार्फत तुमचे आयुष्यमान भारतचे गोल्डन कार्ड दिले जाईल.

अशाप्रकारे तुम्ही वरील प्रमाणे रजिस्ट्रेशन करू शकता.

ट्रान्सजेंडर यांना सुद्धा लाभ । Ayushman Bharat PM Jan Arogya Yojana in Marathi

ट्रान्सजेंडर यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे.

यांच्या विम्याचा खर्च हा सुद्धा भारत सरकारच उचलणार असून सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय करार यांच्यातर्फे हे कार्य होणार आहे.

अशाप्रकारे ट्रान्सजेंडर यांना सुद्धा आता आयुष्यमान कार्ड थेट राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांच्याकडून मिळणार आहे.

त्याचप्रमाणे ज्या ट्रान्सजेंडर चे नाव हे सामाजिक न्याय मंत्रालयाकडे नोंदणीकृत नसेल, त्यांनी आधी आपल्या नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे.

त्यानंतर त्यांचे नाव आपोआप प्राधिकरणाकडे पोचून त्यांना या विम्याचा लाभ घेता येणार आहे.

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 35 लाख कार्ड वितरण । Ayushman Bharat Yojana

मित्रांनो या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून आपल्या देशामध्ये आपले रक्षण करणाऱ्या सीआरपीएफ जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुमारे 35 लाख आयुष्यमान हेल्थ कार्ड दिली गेली आहेत.

आपण घरी असतो मात्र आपले रक्षण जे सीआरपीएफ जवान करतात त्यांच्या कुटुंबीयांना जवळजवळ 24 हजारहून अधिक हॉस्पिटल्स मधून कॅशलेस उपचाराचा लाभ मिळू शकतो,

तसेच केंद्रीय मंत्र नित्यानंद राय यांनी 5 जानेवारी 2020 रोजी ही माहिती आपल्या सर्वांना दिलेली होती.

ज्या लोकांना या योजने ला अप्लाय करायचे असेल त्यांनी पेटीएम ॲप सुद्धा इन्स्टॉल करू शकता कारण या ॲपमध्ये या योजनेला सामावून घेतलेले आहे

संकेतस्थळावरील इतर कार्य

मित्रांनो या वेबसाईटच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही हॉस्पिटल चेक करू शकता.

तसेच संबंधित अधिकाऱ्यांची माहिती सुद्धा मिळवू शकता.

तसेच तुम्हाला जर तक्रार दाखल करायची असेल तर ती तक्रार दाखल करू शकता.

दाखल केलेल्या तक्रारीची स्थिती सुद्धा तपासू शकता.

तसेच तुम्हाला कोणत्या प्रकारचे आरोग्य लाभ पॅकेज पाहायचे असेलही सुद्धा सुविधा या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जन औषधे केंद्र शोधण्यासाठी सुद्धा या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

योजनेअंतर्गत येणारे आजार

  • बाईपास कोरोनरी आर्टरी बदलाव,
  • प्रोस्टेट कर्करोग,
  • कॅरोटीड एनजीओ प्लास्टिक,
  • कवटीच्या शस्त्रक्रिया,
  • डबल वाल्व रिप्लेसमेंट
  • Pulmonary वाल्व रिप्लेसमेंट
  • एंटीरियर स्पाइन फिक्सेशन
  • Laryngopharyngectomy
  • टिश्यू एक्सपेंडर

आयुष्मान भारत योजनेची मुख्य वैशिष्ट्ये :

  • वैद्यकीय तपासणी, उपचार आणि सल्ला
  • अगोदर हॉस्पिटलायझेशन
  • औषधे आणि वैद्यकीय उपभोग्य वस्तू
  • नॉन-इंटेन्सिव्ह आणि गहन काळजी सेवा
  • क्लिनिकल आणि प्रयोगशाळा चाचण्या
  • वैद्यकीय रोपण सेवा
  • गृहनिर्माण लाभ
  • अन्न सेवा
  • उपचारादरम्यान उद्भवलेल्या गुंतागुंतीवर उपचार
  • रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 15 दिवसांपर्यंत पाठपुरावा केला जातो
  • प्री एक्सिस्टिंग डिजीज कवर अप

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत येणारे आजार :

  • ड्रग रिहैबिलिटेशन
  • ओपीडी
  • प्रजनन क्षमता संबंधित प्रक्रिया
  • कॉस्मेटिक प्रक्रिया
  • अवयव प्रत्यारोपण
  • वैयक्तिक निदान

तुम्हाला योजनेबद्दल कोणतीही माहिती मिळवायची असल्यास किंवा योजनेशी संबंधित कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवायची असल्यास, तुम्ही योजनेसाठी आयुष्मान भारत पीएम जन आरोग्य योजना टोल फ्री हेल्पलाइन नंबर 1800111565 वर संपर्क साधू शकता.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

आयुष्मान भारत पीएम जन आरोग्य योजना Ayushman Bharat Yojana

तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स द्वारे नक्की कळवा तसेच हा लेख तुमच्या सर्व मित्र परिवारामध्ये शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा या योजनेबद्दल माहिती कळेल.

Join whatsapp group Join Now
Join Telegram group Join Now

Leave a comment