नवीन विहीर अनुदान योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू! मिळत आहे लाभार्थ्यास ‘4’ लाखांचे अनुदान; त्वरित येथे अर्ज करा.. Vihir Anudan Yojana

Vihir Anudan Yojana Online Form: राज्यभरातील शेतकरी वर्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या माध्यमातून विविध बाबींची पूर्तता करण्यासाठी अनुदान दिलं जातं त्यामध्ये बघितले तर नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, तसेच बोरिंग वीज जोडणी आकार, यासोबतच शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरण, सोबतच महत्त्वाचे म्हणजे सूक्ष्म सिंचन, ठिबक सिंचन, व तुषार सिंचन, पीव्हीसी पाईप, परसबाग, अशा विविध प्रकारच्या बाबीवर अनुदान दिले जाते.

आजच्या लेखांमध्ये या योजने संबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेच्या माध्यमातून नक्की कोणकोणत्या बाबीसाठी किती अनुदान मिळणार आहे (Vihir Anudan Yojana) तसेच आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे ? योजनेसाठी पात्रता काय आहेत यासोबतच ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करावा ? अशा विविध प्रकारच्या संपूर्ण डिटेल मध्ये माहिती लेखांमध्ये पाहणार आहोत.

Vihir Anudan Yojana
Vihir Anudan Yojana

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत कोणत्या बाबींसाठी मिळते सबसिडी

1. नवीन विहीर

2. जुनी विहीर दुरुस्ती

3. इनवेल बोअरिंग

4. वीज जोडणी आकार

5. शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरण

6. सूक्ष्म सिंचन

7. ठिबक सिंचन

8. तुषार सिंचन

9. पीव्हीसी पाईप

10. परसबाग

या योजनेअंतर्गत कोणत्या बाबीसाठी किती मिळते अनुदान?

1. नवीन विहीर रुपये 2 लाख 50 हजार रु.

2. जुनी विहीर दुरुस्ती साठी 50 हजार रु.

3. इनवेल बोअरिंग 20 हजार रु.

4. पंप संच 20 हजार रु.

5. वीज जोडणी आकार 10 हजार रु.

6. शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण 1 लाख रु.

7. सूक्ष्म सिंचन ठिबक सिंचन संच 50 हजार रु.

8. तुषार सिंचन संच 25 हजार रु.

9. पीव्हीसी पाईप 30 हजार रु.

10. परसबाग 500 रु.

ही योजना आपण बघितली तर मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी यासोबतच सातारा सांगली व कोल्हापूर हे सर्व जिल्हे वगळली तर राज्यभरातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येत आहे.

योजनेसाठी लाभार्थी पात्रता

1. लाभार्थी सर्वात प्रथम अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे गरजेचे आहे.

2. लाभार्थी व्यक्तीने जातीचा वैध दाखला त्या ठिकाणी सादर करणे बंधनकारक आहे.

3. जमिनीच्या 7/12 तसेच 8-अ चा उतारा अर्ज करत असताना सादर करणे बंधनकारक आहे.

4. लाभार्थी व्यक्तीची वार्षिक उत्पन्न मर्यादा या ठिकाणी रुपये दीड लाखाच्या मर्यादत असावी

5. उत्पन्नाचा दाखला सुद्धा व्यक्तींना सादर करणे बंधनकारक आहे.

6. लाभार्थीची जमिनधारणा कमीत कमी 0.20 हेक्टर ते जास्तीत जास्त 6 हेक्टर पर्यंत (नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर) असणे गरजेचे आहे.

नवीन विहिरीसाठी आवश्यक कागदपत्रे Vihir Anudan Yojana

1. सक्षम प्राधिकारी यांच्या माध्यमातून मिळालेल्या अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र सादर करावे लागेल

2. 7/12 व 8-अ चा उतारा

3. तहसीलदार यांच्याकडून घेण्यात आलेल्या मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (र. रु. 1,50,000/- पर्यंत).

4. लाभार्थी व्यक्तीचे प्रतिज्ञापत्र. (100/500 रुपयांच्या च्या स्टॅम्प पेपरवर)

5. अपंग असल्यास त्याचे प्रमाणपत्र

6. तलाठी यांच्याकडून घेण्यात आलेला दाखला – सामाईक एकूण धारणा क्षेत्राबाबतचा विशिष्ट दाखला (0.40 ते 6 हेक्टर मर्यादेत); यासोबतच विहीर नसेल तर नसल्याबाबत प्रमाणपत्र;

7. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या माध्यमातून पाणी उपलब्धतेचा दाखला.

8. कृषि अधिकारी (विघयो) यांची झालेली क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र

9. गट विकास अधिकारी यांच्याकडून मिळवलेले शिफारसपत्र

10. ज्या जागेवर विहीर बांधायचे आहे त्या त्याजागेचा फोटो.

11. ग्रामसभेचा ठराव.

अर्ज प्रक्रिया;

तर सादर योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. अर्ज सादर करण्यापूर्वी संबंधित कृषी विभागाशी संपर्क साधू शकता. संपर्क साधण्यासाठी आपल्या संबंधित तलाठी कार्यालयांमध्ये जाऊन कृषी विभाग कोठे आहे? ते पहावे आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. आणि तिथून पुढे ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा (mahadbt). ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करत असताना महाडीबीटी पोर्टलवरून अर्ज सादर करायचा आहे. त्यावेळी आवश्यक कागदपत्रे सुद्धा व्यवस्थितरित्या अपलोड करायचे आहेत. आणि जी काही आवश्यक माहिती आहे ती सुद्धा व्यवस्थित रित्या त्या ठिकाणी भरायचे आहे.

Leave a comment