प्रधानमंत्री उज्वला योजना|Pradhan Mantri Ujjwala Yojana

Pradhan Mantri Ujjwala Yojana marathi , What Is Pradhan Mantri Ujjwala Yojana In Marathi


प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या अध्यक्षतेखालील बैठकीत १० मार्च, २०१६ रोजी प्रधानमंत्री उज्वला योजनेस मान्यता देण्यात आली

सुरूवात १ मे, २०१६

• घोषवाक्य स्वच्छ इंधन, बेहतर जीवन

• योजनेचा उद्देश

Pradhan Mantri Ujjwala Yojana Marathi दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणाऱ्या कुटुंबांना (BPL) निःशुल्क LPG गॅसकनेक्शन उपलब्ध करून देणे.

भारतामध्ये स्वच्छ इंधन वापरात वाढ घडवून आणणे. महिलांच्या आरोग्यामध्ये सुधारणा घडवून आणणे व महिला सशक्तीकरण करणे. प्रदूषण कमी करणे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारद्वारे पुढील ३ वर्षांमध्ये ५ कोटी कुटुंबांना निःशुल्क LPG कनेक्शन उपलब्ध करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. ८ हजार कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. प्रधानमंत्री उज्वला योजनेचा लाभ घेऊ इच्छित ग्राहकास जवळील GPL वितरकाद्वारे किंवा ऑनलाईन डाऊनलोड करून अर्ज प्राप्त करता येतो. हा अर्ज भरून LPG वितरक केंद्रामध्ये जमा करावा. या दोन पानी अर्जामधील संपूर्ण माहिती उदा •नाव, पत्ता, आधारकार्ड नंबर, जनधन/बैंक खाते इत्यादी भरणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा-

• प्रधानमंत्री उज्वला योजनेस आवश्यक कागदपत्रे

  • एक पासपोर्ट आकाराचा फोटो
  • BPL रेशनकार्ड
  • ड्रायव्हिंग लायसेन्स
  • बैंक स्टेटमेंट
  • LIC पॉलिसी
  • पासपोर्ट झेरॉक्स
  • घराची अधिकृत कागदपत्रे टेलिफोन, बीज किंवा पाणी बिल
  • पंचायत अधिकारी किंवा नगरपालिका अध्यक्षांद्वारे अधिकृत BPL प्रमाणपत्र एक फोटो व ओळखपत्र उदा आधारकार्ड किंवा मतदान ओळखपत्र
  • वरील कागदपत्रातील सर्वांची आवश्यकता असणार नाही. यापैकी LPG वितरकास हवी असणाऱ्याच कागदपत्रांची जोडणी करावी लागते.
  • प्रधानमंत्री उज्वला योजना पात्रता
  • ग्राहकाद्वारे देण्यात आलेली सर्व माहिती SEce- २०११ माहितीबरोबर जोडली जाईल व स्थानंतरच हा निर्णय घेतला माईल की, ग्राहक या योजनेस पात्र आहे की नाही.
  • ग्राहकाचे वय १८ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असणे गरजेचे राहील.
  • ग्राहक BPL कुटुंबातील महिलाच असली पाहिजे. पुरुषांना या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही. ग्राहकाच्या घरामध्ये कोणाच्याही नावे पहिले LPG कनेक्शन नसावे.
  • ग्राहकाद्वारे अर्जामध्ये देण्यात येणारी संपूर्ण माहिती सत्य असावी.
  • प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी पात्र BPL कुटुंबाची यादी राज्य सरकार व केंद्रशासित प्रदेशाच्या मदतीने तयार करण्यात
  • • प्रधानमंत्री उज्वला योजनेकरिता भारत सरकारद्वारे योजना कार्यवाहीसाठी एकूण ८००० कोटी रुपयांचे बजेट तयार करण्यात आले आहे, जे ३ वर्षांसाठी राहील.
  • या योजनेवर खर्च होणारा पैसा LPG अनुदानामार्फत बचत करण्यात आलेल्या पैशातून होईल. भारत सरकारमार्फत जानेवारी २०१५ मध्ये Give-It-Up अभियान सुरू करण्यात आले.
  • प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत सरकारद्वारे प्रत्येक पात्र BPL कुटुंबास १६०० रुपयांची आर्थिक मदत उपलब्ध करेल, जी गॅस कनेक्शन खरेदी करण्यासाठी दिली जाईल.
  • प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची संपूर्ण कार्यवाही भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयामार्फत राहील. • प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र ग्राहकास एक नवीन LPG Syliender, एक नवीन रेग्युलेटर, निःशुल्क DGCE पुस्तक, एक सुरक्षा नळी, निःशुल्क जोडणी इत्यादी सुविधा पुरविण्यात येतील.

Leave a comment