गोवंश पाळण्यासाठी आता मिळेल 25 लाख|Govardhan Govansh Seva Kendra

Govardhan Govansh Seva Kendra yojana 2023 in Marathi

गोवर्धन गोवंश सेवा केंद्रची सुरुवात  

राज्यस्तरीय योजनेंतर्गत २०१७-१८ मध्ये राज्यातील मुंबई आणि उपनगर हे २ जिल्हे वगळता उर्वरित ३४ जिल्ह्यांमध्ये गोवर्धन गोवंश सेवा केंद्र सुरू करण्यास सरकारने मान्यता दिली असून यासंबंधी कृषी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाने २६ एप्रिल, २०१७ रोजी  एक शासन निर्णय घेतला आहे.

Govardhan Govansh yojana 2023
Govardhan Govansh yojana 2023

गोवर्धन गोवंश सेवा केंद्रची मुख्य हेतू.

गोवंशाचा सांभाळ जसे की (भाकड गायी व बिनकामाचा बैल,वळु इ.) करण्यासाठी गोशाळांना अर्थसहाय्य देणे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा-

गोवर्धन गोवंश सेवा केंद्रचा मुख्य उददेश –

Govardhan Govansh Seva Kendra yojana 2023 in Marathi

जे गाय असेल बैल असेल किंवा म्हशी,वळु किं ज्यांचा जे दुध देत नाही शेतीच्या कामासाठभ्‍ ज्यांचा फायदा होत नाही त्या गोवंशाचा सांभाळ करणे.
पशुधनासाठी चारा असेल, पाणीची मुबलक प्रमाणात सोय करणे तसेच गोवंशसाठी चांगल्या प्रतीची  व निवाऱ्याची सोय उपलब्ध करून देणे

सेवा केंद्रांमध्ये पशुधनासाठी आवश्यक असलेल्या  चा-यासाठी कार्यक्रम राबविणे

गोमूत्र, शेण इत्यादी पासून विविध उत्पादने, खत, गोबर गॅस व इतर उप पदार्थांच्या निर्मितीस प्रोत्साहन देणे


गोवर्धन गोवंश सेवा केंद्रचा लाभार्थ्याची निवड कशी करतात-

Govardhan Govansh Seva Kendra yojana 2023 in Marathi

ही योजना स्वयंसेवी संस्थांमार्फत राबविली जाणार असल्यामुळे याअंतर्गत येणाऱ्या ला यांच्या निवडीचे निकष, अटी व शर्तीही या विभागाने निश्चित केल्या आहेत.

ही संस्था धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असावी.

या संस्थेस गोवंश सेवा घ्यावयची आहे अशा संस्थांना कमीत कमी  गोवंश संभाळायाचा कमीत कमी ३ वर्षांचा अनुभव असावा.

केंद्रावर असणान्या पशुधनास आवश्यक असलेली वैरण, चारा उत्पादनासाठी तसेच पशुधन संगोपनासाठी संस्थेकडे स्वतःच्या मालकीची अथवा ३० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरची किमान १५ एकर जमीन असणे आवश्यक आहे.

या योजनेंतर्गत मागणी करण्यात आलेल्या एकूण अनुदानाच्या कमीत कमी १०% एवढे खेळते भागभांडवल संस्थेकडे असावे.

संथेचे मागील 3 वर्षाचे लेखापरीक्षण केलेले असावे

.या योजनेअंतर्गत ज्यासाठी एकदा अनुदान उपलब्ध करून दिल्यानंतर त्या बाबींसाठी परत अनुदान दिले जात नाही.

या संस्थांकडे पशुच्या देखभालीसाठी व चाऱ्यासाठी स्वतःचे उत्पन्नाचे साधन आहे अशा संस्थांना प्राधान्य देण्यात येईल

राज्यपुरस्कृत योजना आहे.


महाराष्ट्र राजय्‍  सरकारकडून 2019-20  या आर्थिक वर्षात पुर्वीच्या योजनेमध्ये सुधारणा करुन नवीन सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना राबविण्याचा विचार करण्यात येणार आहे

सुधारित योजनेनुसार राज्यातील ३४ जिल्ह्यातील १७९ उपविभागांपैकी ज्या महसूली उपविभागांमध्ये यापूर्वीच्या योजनेत गोशाळांसाठी अनुदान देण्यात आले आहे, असे ४० उपविभाग वगळता इतर १३९ उपविभाग समाविष्ट करण्यात आले आहेत.

प्रत्येक महसुली विभागात २ याप्रमाणे गोशाळांची निवड करून त्यांना शासन निर्णयाप्रमाणे अनुदान देण्यात येईल.

पहिल्या टप्यात १५ लाख व दुसऱ्या टप्यात १० असे एकूण २५ लाखांचे अनुदान प्रत्येक गोशाळेस देण्यात येईल.
देण्यात येणार आहे.
मुंबई व मुंबई उपनगर या २ जिल्ह्यातील भाकड गायी व गोवंश यांना लगतच्या ठाणे जिल्ह्यातील गोशाळेत वर्ग करावेत.

Leave a comment