मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना|CM Agriculture and Food Processing Scheme-2023

CM Agriculture and Food Processing Scheme
CM Agriculture and Food Processing Scheme

CM Agriculture and Food Processing Scheme-2023 Marathi
मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया  या योजनाची सुरूवात २० जून, २०१७

• उद्देश

शेता मधील पिकवलेल्या मालाचे मूल्यवर्धन करण्यासाठी शेतक-यांचा सहभाग घेण्यास लावणे तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प स्थापन करणे तसेच त्या प्रकल्पांच्या आधुनिकीकरणास प्रोत्साहन देणे.

अन्न प्रक्रिये द्वारे उत्पादित झालेल्या  मालास ग्राहकांची पसंती,  तसेच बाजारपेठ निर्माण करणे व निर्यातीस मोठया प्रमाणात प्रोत्साहन देणे

कृषि व अन्न प्रक्रियेसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणे ग्रामीण भागात लघु व मध्यम अन्न प्रक्रिया उद्योगांना प्राधान्य देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे

या योजनेसाठी प्रतीवर्ष ५० कोटी इतका निधी देण्यात येणार आहे.

या योजनेंतर्गत शेतीमालाचे मूल्यवर्धन, उत्पादित अन्न पदार्थांच्या गुणवत्तेत वाढ, कमी करणे, बाजारपेठेची निर्मिती यास प्रोत्साहन देण्यात येईल.

• शेतमालाच्या काढणीनंतरचे नुकसान ऊर्जा बचतीसाठीच्या प्रकल्पांचे आधुनिकीकरण, प्रक्रिया केलेल्या उत्पादनाची निर्यात आणि ग्रामीण भागातील लघु व मध्यम अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन आदी बाबीसुद्धा या योजनेत समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

या योजनेंतर्गत शेतकल्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित फलोत्पादने आणि खाद्यान्न व तेलबिया इत्यादी शेतमालासाठी अग्र प्रक्रिया प्रकल्प स्थापन करता येतील.

• फळे व भाजीपाल्यासारख्या हे  नाशवंत  पदार्थ आहे त्यांना प्राधान्याने शेतमाल प्रक्रियेच्या प्रकल्पांना योजनेमध्ये प्राधान्य देण्यात येईल.

• ही योजना २०१७-१८ पासून पाच वर्षांसाठी १००% राज्य पुरस्कृत असून त्यानंतर योजनेच्या मूल्यमापन जो अहवाल येणार त्या अहवालाच्या आधारावर ती पुढे चालू ठेवायची कि नाही याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

या योजनेमध्ये कृषी व अन्न प्रक्रिया प्रकल्पाच्या उभारणीसह अस्तित्वातील प्रकल्पांची गुणवत्ता वाढ व आधुनिकीकरणआणि शीत साखळी योजना तसेच मनुष्यबळ निर्मिती व विकास योजना हे तीन मुख्य घटक राहणार आहेत. या नवीन योजनेसाठी फळे व भाजीपाला, अन्नधान्य, कडधान्ये, तेलबिया उत्पादने इत्यादीवर आधारित अन्न प्रक्रिया प्रकल्प चालविणारे किंवा अशा प्रकारचे प्रकल्प स्थापन करू इच्छिणारे शासकीय-सार्वजनिक उद्योग, सक्षम शेतकरी उत्पादक कंपनी गट, महिला बवत गट, खाजगी  क्षेत्रातील उद्योग क्षेत्र, ग्रामीण  भागातील बेरोजगार युवक असेल, सहकारी संस्था पात्र ठरतील.

अधिक माहितीसाठी क्लिक करा-


• कारखाने, यंत्रे आणि प्रक्रिया प्रकल्पासाठी करावे लागणारे बांधकाम यासाठी येणाऱ्या खर्चाच्या ३०% अनुदान या योजनेंतर्गत देण्यात येईल. या अनुदानाची कमाल मर्यादा 50 लाख रुपये आहे.

प्रकल्पाला मंजूर करण्यात येणाऱ्या रकमेपेक्षा कर्जाची रक्कम किमान दीडपट असणे आवश्यक राहील.. त्याचप्रमाणे केंद्र व राज्य संस्थांकडून प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीसाठी प्रशिक्षण शुल्काच्या ५०% अनुदान देण्यात येणार आहे.

• योजनेवर सनियंत्रण व देखरेखीसाठी कृषी व फलोत्पादन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियामक मंडळ असेल या योजनेंतर्गत प्राप्त प्रकल्पांची छाननी करून त्यास मंजूरी देण्यासाठी कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आय प्रकल्प मंजुरी समिती राहणार आहे.

• प्रत्येक वर्षी ५० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे.

CM Agriculture and Food Processing Scheme-2023 marathi महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री कृषी आणि अन्न प्रक्रिया योजना लागू करण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. सरकारने 2023-24 या वर्षासाठी 100 कोटी रुपये वितरित करण्यास आर्थिक मान्यता दिली आहे. अन्न प्रक्रिया आणि कृषी उत्पादनांच्या मूल्यवर्धनासाठी राज्यात मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना सुरू करण्यात आली आहे. याद्वारे कृषी प्रक्रिया आणि भरड धान्यावरील मूल्यवर्धनावर विशेष भर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी 20 जून 2017 रोजी मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत राज्यात पाच वर्षांसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेचा कालावधी 2021-22 मध्ये पूर्ण झाला. त्यानंतर 2022-23 च्या अर्थसंकल्पात ही योजना पुन्हा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार राज्यात सन 2026-27 पर्यंत ही योजना राबविण्यात येणार आहे

Leave a comment