स्व.भाऊसाहेब फुडंकर फळबाग लागवड योजना 2022-23|Bhausaheb Phundkar Falbagh Lagvadh Yojana

योजनेची व्याप्ती व अंमलबजावणी :-

योजना अंमलबजावणी राज्यातील संपूर्ण 34 जिल्ह्यात करण्यात यईल



स्व.भाऊसाहेब फुडंकर फळबाग लागवड योजना लाभार्थी पात्रता:-


१ मनरेगा योजनेमध्ये   जे शेतकरी फळबाग लागवडी करीता पात्र ठरू शकत नव्हते असे शेतकरी
२ योजनेचा लाभ फक्त वैयक्तिक पणे शेतक-यांना होईल. संस्थात्मक लाभार्थ्यांना लाभ घेता येणार नाही.
२ शेतकल्याच्या स्वतःच्या नावे ७/१३ असणे आवश्यक आहे. जर एखादया शेतक-याचा 7/12 मध्ये एकत्र किंवा संयुक्त खाते असले तर त्या संर्वांचे संमतीपत्र आवश्यक राहील.
२जमिन कुळकायदयाखाली येत असल्यास ७/१२ च्या उत्तान्यावर जर कुळाचे नाव असेल तर योजना राबविण्यासाठी कुळाचे संमतीपत्र आवश्यक राहील,
२यापूर्वी महाडिवीटीयर प्राप्त झालेल्या अर्जामधून सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,महिला व अपंग व्यक्ती यांची निवड करण्यात येईल.

स्व.भाऊसाहेब फुडंकर फळबाग लागवड योजना लाभ क्षेत्र मर्यादा:-

या योजने अंतर्गत फळबाग लागवडीकरीता कोकण विभागासाठी किमान 0.10 हेक्टर ते कमाल 10.00हेक्टर तर उर्वरीत विभागासाठी किमान 0.20 हेक्टर ते कमाल  6.00 हेक्टर क्षेत्र मर्यादा अनुज्ञेय राहील.

१ जास्तीत जास्त क्षेत्रामध्ये शेतक-यास वाटल्यास तो फळपिके लागवड करु शकतो
२ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये पात्र असणाऱ्या शेतकन्यांनी सदर योजनेचा दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत लाभ घेतल्यानंतर उर्वरीत क्षेत्रासाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमूघन लाभ घेता येईल.
३ लाभार्थ्यानि यापूर्वी राज्य रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड या अन्य योजने अंतर्गत लाभ घेतला असल्यास सदर लाभ घेतलेले क्षेत्र वगळून उर्वरीत कमाल क्षेत्र मर्यादिपर्यंत लाभार्थी पात्र राहील

स्व.भाऊसाहेब फुडंकर फळबाग लागवड योजनासमाविष्ट पिके :

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत पुढीलप्रमाणे १६ बहुवार्षिक फळपिकांचा समावेश: करण्यात आला असुन शेतक-यांना आवश्यकतेनुसार सर्व फळपिकांच्या कलमे/रोपांची लागवड करण्यास योजना अंमलबजावणी असेपर्यंत मान्यता आहे राज्याच्या कृषि हवामान क्षेत्रास अनुकुल असणाऱ्या फळपिकांच्या कलमांची/रोपांची कृषि विद्यापीठाने शिफारस  केली असेल तर ते फळ किंवा रोपे ची लागवड करण्यास चालतील.


अनुदान मर्यादा 100% अनुदान राज्य सरकार देणार

अर्जदारांची नोंदणी व आधार प्रमाणीकरण :-

सर्व इच्छुक शेतकऱ्यांना महा-डीवीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर जाऊन स्वतःची नोंदणी करावी लागेल आणि आपल्या आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया फक्त एकदाच शेतक-यांना करावयाची आहे.
५.१ संकेतस्थळ- महा डीबीटी पोर्टलचे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना तसेच ठिबक सिंचन या बाबी करीता https://mahadbtmahait.gov.in/ या संकेत स्थळावर वेगवेगळे अर्ज करावेत संकेतस्थळावरील ‘शेतकरी योजना” हा पर्याय निवडावा.

५.२ अर्जदार नोंदणी अर्जदारांनी प्रथमतः वापरकर्त्याचे नाव (User name) व संकेतशब्द (Password) तयार करून घ्यावा व आपले खाते उघडावे महा डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याबाबत सविस्तर माहिती user manual द्वारे दिली असून ते पोर्टलवर माहितीस्तव ठेवण्यात आलेले आहे.

५.३ अर्ज शुल्क: अर्ज सादर करतेवेळी शेतकऱ्यांनी रु. २०/- शुल्क व रु. ३,६०/- जी.एस.टी. मिळून एकूण रु.23.60 रुपये /- शुल्क Online भरावयाचे आहे तदनंतर, महा- आयटी महामंडळाकडे शेतकऱ्यांचा अर्ज पुढील प्रक्रीयेकरिता पाठविला जाईल.


अर्जदारास विशेष सुचना



• अर्जदाराने अर्ज करतांना ७/१२, ८ अ नुसार क्षेत्र, सर्व्हे नंबर, गावाचे नाव इत्यादी सर्व माहिती अचुक भरणे आवश्यक राहील. अर्ज भरतांना चुकीची माहिती भरल्यास अर्ज रद्द होणार असल्याने तसेच अर्जामध्ये दर्शविलेल्या क्षेत्राप्रमाणे तसेच कलम/ रोप व लागवडीचे अंतर यांचे अनुदान मंजुर मापदंडाप्रमाणे देय असल्यामुळे शेतक-यांनी सदर माहिती काळजीपूर्वक भरावी.

• फळबाग लागवडीचा लाभ घेण्यासाठी आनलाईन अर्ज करतेवेळी फळपिकाचे नाव, प्रकार-

कलम / रोप लागवड अंतराचे अंदाजपत्रकात “मीटर” मध्ये देण्यात आले असुन उपलब्ध करुन देण्यात आलेल्या अंतरापैकी पसंतीनुसार शेतक-यांनी किवा लाभार्थीनी ते अंतर निवडावे.

अर्जदाराने अर्जात नमुद केलेल्या माहितीनुसार पूर्वसंमती रक्कमेच्या मर्यादित अनुदान देय राहणार  असल्याने अर्जामध्ये अचुक माहिती भरावी.


६. संगणकीय सोडतः



शेतकऱ्यांनी  फळबाग योजनेसाठी अर्ज केलेल्या   बाबींची महाडीबीटी पोर्टलवरील तालुका पातळीवर online पध्दतीने संगणकीय सोडत काढण्यात येईल तथापि ज्या प्रवर्गासाठी तालुका स्तरावर पुरेसा आर्थिक लक्षांक उपलब्ध होणार नाही अशावेळी फेरवितरण या सुविधेचा वापर करून जिल्हा कृषि अधकारी स्तरावरून तालुक्यांना लक्षांक फेरवाटप करावा. Online पदधतीने निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर (SMS) त्याच्या निवडीबाबत अवगत करण्यात येईल. त्यामुळे शेतक-याने सेवा केंद्र धारकांचा अथवा अन्य व्यक्तीचा मोबाईल नंबर देता स्वतःचा मोबाईल क्रमांक नमूद करावा


कागदपत्रे अपलोड करणे:


७.१ संगणकीय सोडतीत निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांची ज्या बाबीसाठी निवड झाली असेल त्यासंबंधीची आवश्यक कागदपत्रे महा डीबीटी पोर्टलवर सादर (Upload) करण्याबाबत त्यांच्या मोबाईल क्रमांकावर लघु संदेशाद्वारे (SMS) कळविण्यात येईल.

७.२ शेतकऱ्यांना सोडतीमध्ये निवड झाल्यानंतर sms येईल त्याप्रमाणे कागदपत्रे upload करणेकरीता 7 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत कागदपत्रे अपलोड न केल्यास त्यांना मोबाईलद्वारे sms पाठवुन आणखी ०३ दिवसांची मुदत दिली जाईल आणि या दिलेल्या मुदतीत जे शेतकरी कागदपत्र upload करणार नाहीत त्यांचे अर्ज रद्द करण्यात येईल.

७.१ online सोडत झाल्यानंतर महा डीबीटी पोर्टलवर काय कागदपत्रे अपलोड करावयाची  त्यांची यादी खालीलप्रमाणे

१. ७/१२ उतारा (मालकी हक्क तपासणेसाठी २. ८ अ उतारा (एकूण क्षेत्राच्या माहीतीसाठी व एकापेक्षा अनेक गावात जमीन असल्यास))

३. सामाईक क्षेत्र असलेल्या लाभार्थी शेकल्याने इतर खातेदारांचे सहमती पत्र सादर करणे बंधनकारक असून ते विहित नमुन्यात अपलोड करावेत.

४. आधार कार्ड

५. आधार लिंक बैंक खाते क्रमांक

६. कागदी लिंबू, संत्रा व मराठी या लिंबूवर्गीय फळपिकांच्या लागवडीकरीता माती परिक्षण अहवाल कागदपत्रांबरोबर अपलोड करावा

अधिक माहितीसाठी क्लिक करा-

Leave a comment